शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

क्रेनची कॅप तुटली; विहिरीत पडल्याने मजुराचा मृत्यू

By admin | Updated: February 15, 2016 02:35 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी खुर्द येथील घटना; चालकासह दोन जखमी

कुरूम (जि. अकोला): खोदकाम करण्यासाठी क्रेनच्या टपामध्ये बसून विहिरीत उतरत असताना कॅप तुटल्याने मजूर ठार झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी मूर्तिजापूर तालु क्यातील जामठी खुर्द येथे घडली. विलास महादेव अडसोड (३५, रा. जामठी खुर्द) हे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव असून, या दुर्घटनेत ब्लास्टिंग ट्रॅक्टरचा चालक दीपक भोलानाथ सूर्यवंशी (३८, रा. मधापुरी) व विक्की रामेश्‍वर अडसोड (२0, रा. जामठी खुर्द) हे जखमी झाले. जामठी येथील श्रीकृष्ण तानाजी नेवारे यांच्या शेतात असलेल्या विहिरीचे खोदकाम व गाळ काढण्याकरिता तीन मजूर क्रेनच्या टपामध्ये बसून उतरत होते; मात्र अचानक बेरिंग आवरण (कॅप) तुटल्याने मजूर ६0 फूट विहिरीत कोसळले. ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना बाहेर काढण्यात आले. दोन जखमींना तातडीने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच मानाचे ठाणेदार चंदू पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पद्मणे, भूषण नेमाडे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी मापा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.