शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

गायी वाटपात झाला घोटाळा !

By admin | Updated: July 10, 2015 01:37 IST

चौकशी अंतिम टप्प्यात; लवकरच येणार अहवाल बाहेर.

राजरत्न सिरसाट/अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेज अंतर्गत गायींचे वाटप करण्यात आले. या वाटपात अकोला जिल्हय़ात घोटाळा झाला आहे. या घोटाळ्य़ाची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यात काही नावे निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे. विदर्भ विकास पॅकेजच्या गायी वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर या घोटाळ्य़ाची चौकशी होण्यास सात वर्ष विलंब लागला. या संदर्भात लोकमतने वस्तुस्थिती मांडल्याने लाभधारक संस्थांचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने दिले होते. त्यानुसार दीड महिन्यापासून या गायी वाटप घोटाळाप्रकरणी चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन केंद्र शासनाने पंतप्रधान व राज्य शासनाने विशेष मुख्यमंत्री पॅकेज दिले होते. केंद्र आणि राज्य मिळून जवळपास चार हजार सातशे पन्नास कोटींचे हे पॅकेज होते. अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसह या पॅकेज अंतर्गत कृषिविकासाच्या योजना, शेतकर्‍यांना जोडधंद्यांबाबत विविध योजना राबविण्यात आल्या. विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत विदर्भातील ११ जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी एक हजार गायींचे पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले होते; पण अनेक ठिकाणी त्यांचे वाटप कागदोपत्रीच झाले. अकोला जिल्हय़ातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांना एक हजार गायींचे वाटप करण्यात आले आहे; परंतु यातील अनेक संस्थांना गायी खरेदी केल्याचे कागदोपत्री भासवून या पॅकेजच्या अनुदानाच्या रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारी झाल्या. यासंदर्भात तत्कालीन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व सहायक निबंधक सहकारी संस्था (पदूम), अकोला यांनी संयुक्तरीत्या चौकशी करू न शासनाला अहवाल दिला होता. या अहवालात मूर्तिजापूर तालुक्यात सहा संस्थांच्या माध्यमातून ४१ गायी खरेदी केल्या नसल्याचे चौकशीअंती आढळल्याचे नमूद केले आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या माध्यमातून २६ गायींची खरेदी झालीच नाही तर तेल्हारा तालुक्यातील एका संस्थेने नऊ गायी, तर आकोट तालुक्यातील एका संस्थेने पाच गायींची खरेदी कागदोपत्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती; पण या चौकशीनंतर हे प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. तथापि, लोकमतने या प्रकरणी वाचा फोडल्यानंतर विद्यमान राज्य सरकारने नव्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी पूर्ण झाली आहे.