शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशाला ग्रामगीतेची गरज- बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 13:58 IST

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते.

अकोला : देशाला गीतेची नाही तर ग्रामगीतेचीच गरज आहे. आजच्या युवकांना ग्रामगीता समजली पाहिजे, राष्ट्रसंतांचे विचार त्यांच्या डोक्यात भिनले पाहिजे. हे महान कार्य हाती घेऊन हे साहित्य संमेलन अविरत सुरू आहे. लोकवर्गणीतून सुरू असलेले हे विचार साहित्य संमेलन अधिक कृतिशील बनवण्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली.वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीद्वारा आयोजित सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते. सेवा समितीच्या या कार्याला बच्चू कडू यांनी शुभेच्छा दिल्या. या सेवा मंडळाच्या कार्याची स्तुती करीत राष्ट्रसंतांचे विचार अधिक व्यापक करण्यासाठी या संमेलनाला अधिक व्यापक करण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही कडू यांनी दिली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या विचारावरच आपण कार्य करीत असल्याचे ते म्हणाले. आपण मंत्री नसून, आपला सेवक असल्याचे उद्गार काढताच सभामंडप टाळ्यांच्या गजरात कडाडून गेले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ ग्रामगीता प्रचारक सत्यपाल महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, संदीपपाल महाराज, संमेलनाध्यक्ष रामदास चोरडे गुरुजी, मनपा स्थायी समिती सभापती विनोद मापारी, माधव राऊत, सावळेगुरुजी, सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, प्रहारचे मनोज पाटील, तुषार फुंडकर, कपिल ढोके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन मोहोकार यांनी केले. आभार गोपाल गाडगे यांनी मानले. 

 

टॅग्स :rashtrasant tukdoji maharaj vichar sahitya samelanराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनBacchu Kaduबच्चू कडूAkolaअकोला