शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची खेडा खरेदी प्रति क्विंटल ३,९00 रुपयांवर; आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात दर कोसळल्याचा परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:08 IST

अकोला : आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात दर कोसळल्याने भारतातील दरात प्रतिक्विंटल ७00 ते ८00 रुपये घट झाली असून, उच्च प्रतीच्या लांब धाग्याच्या कापसाला आजमितीस ४,८00, तर खेड्यात खरेदी केल्या जात असलेल्या कापसाला  ३,९00 ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत.

ठळक मुद्देउच्च प्रतीच्या लांब धाग्याच्या कापसाला ४,८00 रुपये प्रतिक्विंटल दर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात दर कोसळल्याने भारतातील दरात प्रतिक्विंटल ७00 ते ८00 रुपये घट झाली असून, उच्च प्रतीच्या लांब धाग्याच्या कापसाला आजमितीस ४,८00, तर खेड्यात खरेदी केल्या जात असलेल्या कापसाला  ३,९00 ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. मागील पंधरवड्यात हेच दर प्रतिक्विंटल ५४00 ते ५,६00 रुपयांवर गेले होते. दरम्यान, २९ जानेवारीपर्यंत  देशात १ कोटी ९0 लाख गाठींच्यावर बाजारात आवक झाल्याचा अंदाज उद्योजकांनी वर्तविला. यावर्षी शेतकर्‍यांनी कापूस पीक पेरणीवर भर दिला असून, राज्यात १0 टक्के कापसाचे क्षेत्र वाढले आहे. आता भारतीय बाजारपेठेसह सर्वत्र कापसाची मागणी वाढली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याने भारतात हे दर घटले. सोमवारी खासगी बाजारात कापसाचे प्रतिक्विंटल दर ४,८00  रुपयांपर्यंत कमी झाले. त्यामुळे कापूस बाजारपेठेत १ लाख ९0  हजार गाठी कापसाची खरेदी करण्यात आली.

खेडा खरेदी ३,९00 रुपयांवरअनेक व्यापारी खेड्यात जाऊन कापूस खरेदी करतात. सध्या ही खरेदी जोरात आहे. पण, दर मात्र ३,९00 ते ४ हजार रुपये प्रतिक्ंवटल दिले जात आहेत.

सरकीच्या दरात ५0 रुपयांनी वाढ कापसापासून मिळणार्‍या सरकीचे दर प्रतिक्विंटल १,९00 रुपये होते, या दरात ५0 रुपयांनी वाढ झाली. सरकीच्या दरात वाढ झाली, तर कापसाच्या दरात वाढ होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कोसळले असले, तरी आपल्याकडे कापसाचे दर वाढण्याची शक्यताही व्यापारी वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात (न्यूर्याक कॉटन) कापसाचे दर कमी झाल्याने त्याचे परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाले असून, कापसाचे दर हे सरासरी सहाशे ते सातशे रुपयांनी घटले. पण, यामध्ये पुढे सुधारणा होण्याची शक्यताही आहे.- वसंत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.

टॅग्स :cottonकापूस