शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणीला वेग!

By admin | Updated: November 16, 2016 02:16 IST

कापसाचा उतारा एकरी सरासरी सात ते आठ क्विंटल; नोटांच्या विमुद्रीकरणामुळे शेतकरी अडचणीत.

अकोला, दि. १५- विदर्भातील नगदी पीक कापूूस खरेदीला वेग आला असून, यावर्षी समाधानकारक व पोषक पाऊस झाल्याने कापसाचा एकरी उतारा सरासरी सात ते आठ क्विंटल लागला आहे; पण नोटांच्या विमुद्रीकरणाचा परिणाम कापूस विक्रीवर झाला आहे.राज्यात गतवर्षी ३८ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली होती. यावर्षी ३८ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र केवळ १३ हजार हेक्टरने कमी झाले आहे. समाधानकारक पावसामुळे उत्पादन होणार असल्याचे चित्र आहे. राज्यात मराठवाडा, खान्देश व सोलापूर जिल्हय़ांचा भाग तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्हय़ांत कापूस उत्पादन घेतले जाते. कापूस हे नगदी पीक आहे; परंतु पावसाच्या अनिश्‍चिततेचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून कापसाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने विदर्भातील शेतकर्‍यांनी यावर्षी कापसाचे क्षेत्र कमी केले. असे असले तरी पश्‍चिम विदर्भात आठ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पैदासकार, पायाभूत व प्रमाणित कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. या प्रक्षेत्रावरील कापूस बहरला असून, चंद्राप्रमाणे रात्री पांढर्‍या शुभ्र कापसाने शेतं उजळून निघाली आहेत. येथील उत्पादनही एकरी ८ ते ९ क्विंटल असल्याने पुढच्या वर्षी देशी कापसाचे बियाणे शेतकर्‍यांना सहज उपलब्ध होईल, अशी कृषी तज्ज्ञांना अपेक्षा आहे.

- कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर कापूस फुलला असून, एकरी आठ ते नऊ क्विंटलचा उतारा (उत्पादन) येत आहे. त्यामुळे यावर्षीची स्थिती समाधानकारक आहे.डॉ. टी.एच. राठोड,विभाग प्रमुख,कापूस संशोधन, डॉ. पंदेकृवि, अकोला.