शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी केंद्र दोन वर्षांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:46 IST

शिर्ला : कापूस खरेदीसाठी शेतकर्‍यांना ऑनलाइन नोंदणी करण्याची अट लादण्यात आली आहे; मात्र पातूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस खरेदी केंद्र गेल्या दोन वर्षांपासून बंदच असल्याने नोंदणी कुठे करावी, असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांना पडला आहे. 

ठळक मुद्देपातूर बाजार समितीतील चित्र नोंदणी कुठे करावी, शेतकर्‍यांना प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : कापूस खरेदीसाठी शेतकर्‍यांना ऑनलाइन नोंदणी करण्याची अट लादण्यात आली आहे; मात्र पातूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस खरेदी केंद्र गेल्या दोन वर्षांपासून बंदच असल्याने नोंदणी कुठे करावी, असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांना पडला आहे. खरीप हंगाम २0१७-१८ मध्ये हमीदरावरील कापूस खरेदीसाठी पणन महासंघाने शेतकर्‍यांना सात-बारा, आधार कार्ड, बँक पासबुकच्या सविस्तर माहिती असलेल्या पहिल्या पानाची स्पष्ट झेराक्स, आयएफसी कोड, खाते क्रमांक, ब्रँच कोड आदी माहिती देऊन ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. नोंदणी करण्याची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीने करण्याची सूचना पणन महासंघाने दिली होती; मात्र तरीही पातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांची नोंदणी करण्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे, तर नोंदणी करण्यासाठी आवश्यक कर्मचारीही उपलब्ध करून दिले नसल्याचे चित्र आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेल्या दोन तीन सेवकांना अधिकृत करणे व त्या सेवकांची नावे जवळच्या कापूस पणन महासंघाच्या विभागीय कार्यालयात कळविणे, त्याबरोबरच सदर पद्धतीचा अवलंब १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आदेश बाजार समित्यांना दिला आहे. 

पातूर येथील बाजार समितीतील कापूस खरेदी केंद्र गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्याबरोबरच कापूस खरेदी करण्यासाठी मान्यता नाही. त्याबरोबरच सचिव आणि एक वगळता येथे एकही कर्मचारी नाही. - संजय भगत, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पातूर.

टॅग्स :agricultureशेती