शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ढेपचे भाव क्विंटलमागे पाचशे रुपयांनी घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:16 IST

२३०० रुपये क्विंटल असलेली ढेप दोन दिवसांत थेट पाचशे रुपयांनी घसरून १८०० रुपये क्विंटलवर आली आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गत दोन दिवसांत सरकी ढेपचे भाव क्विंटलमागे पाचशे रुपयांनी घसरल्याने अकोला, अमरावती, खामगाव आणि जालना परिसरातील ढेपीची बाजारपेठ हादरली आहे. २३०० रुपये क्विंटल असलेली ढेप दोन दिवसांत थेट पाचशे रुपयांनी घसरून १८०० रुपये क्विंटलवर आली आहे. ढेपीचे भाव उतरल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला असला तरी अकोल्यातील दोनशे ढेप मिल उद्योजक मात्र चिंतेत पडले आहे.गत तीन महिन्यांत सरकी ढेपीच्या दरात मोठी उलाढाल झाल्याने अनेकांना कोट्यवधींचा फटका सहन करावा लागत आहे. तीन महिन्यांआधी सरकी ढेपीचे दर ४२०० रुपये क्विंटल होते. सरकी ढेपीचे दर आटोक्यात येत नसल्याने दूध व्यावसायिकांनी आंदोलन करून दुधाचे दर वाढविले. त्यापाठोपाठ दूध कंपन्यांनीदेखील दरवाढ केली. त्यामुळे सरकी ढेपीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली. ‘एनसीडीईएक्स’नेदेखील सरकी ढेपीचा मोठा स्टॉक करून ठेवलेला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत सरकी ढेपीचे भाव २३०० रुपयांवरून घसरून थेट १८०० रुपयांवर आले आहे. सरकी ढेपीचे भाव वाढले तर दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता ढेपीचे भाव घसरले तर दुधाच्या भावात घसरण झालेली नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचा पेरा जास्त असल्याने कापसातून निघणारी सरकी आणि त्यावर होणारे प्रक्रिया उद्योगही याच परिसरात आहेत. त्यामुळे अकोला, अमरावती, खामगाव आणि जालना, मराठवाडा परिसरात सरकीपासून तेल काढणारे आणि सरकीपासून ढेप काढणारे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. अकोला जिल्ह्यात दोनशे सरकी ढेपीचे उद्योग आहेत. या परिसरातून देशभरात सरकी ढेप निर्यात केली जाते; मात्र सरकी ढेपीचे भाव कोसळल्याने अकोल्यातील दोनशे उद्योजकांना जबर फटका बसला आहे.सरकी ढेपचे भाव स्थिर राहण्यासाठी राज्य शासनाने त्यावर नियंत्रण आणावे, अन्यथा दुग्ध विक्रीचा आणि दुधाशी संबंधित सर्व उद्योग अडचणीत येतील.-गणेश चौधरी,पशुपालक, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय