शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी संथ गतीने; केवळ ७४ हजार क्विंटल कापूस खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:07 IST

खरीप हंगाम आणि पावसाळा तोंडावर आल्याने रात्रंदिवस खरेदी करण्याची गरज आहे.

अकोला : जिल्ह्यात कापूस खरेदी संथ गतीने सुरू असल्याने आतापर्यंत केवळ ७४ ते ७५ हजार क्विंटलच कापसाची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे आणखी ६० टक्क्यांच्यावर कापूस पडून आहे; खरीप हंगाम आणि पावसाळा तोंडावर आल्याने रात्रंदिवस खरेदी करण्याची गरज आहे.अशा परिस्थितीतही कापूस खरेदीचे निकष बदलले नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. जिल्ह्यात जवळपास ३२ हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने ५,२४३ वर शेतकºयाची नोंदणी केली आहे; पण प्रत्यक्षात आतापर्यंत सरासरी १५ टक्केही कापसाची खरेदी झाली नाही. त्यामुळे शेतकºयांच्या हिताच्या राज्य सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीत टाळाटाळ का होत असल्याचा आरोप होत आहे. सीसीआय, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. या दोन्ही मुख्य खरेदीदारांनी जिनिंगला कापूस खरेदीची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिनिंगवर किमान २५ ते ३० गाड्या कापूस उतरवून घेतल्या जात होता. आता केवळ दहाच कापसाची वाहने कापूस खरेदी केला जात आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास ५० ते ६० टक्के कापूस शेतकºयांकडे आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ५ हजार २४३ कापूस उत्पादक शेतकºयांनी कापूस विकण्यासाठी नोंदणी केली आहे; पण येथे दररोज २० गाड्यांमधील कापूस खरेदी केल्यास खरेदीला खूप दिवस लागतील. सध्या शेतकºयांच्या हातात पैसा आला, तरच पुढची कामे सुरू होतील. या पृष्ठभूमीवर पणन, सीसीआय आणि जिनिंगमध्ये रात्रंदिवस कापूस खरेदीची सुरुवात करावी, अशी मागणी आहे.  निकष बदला!पणन महासंघाची राज्यात १४१ जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआयचीदेखील आहे; पण खरेदीचे निकष बदलणे गरजेचे आहे. अकोला जिल्ह्यात मोजकेच जिनिंग कापूस खरेदी करीत आहेत. हे जिनिंग कापूस खरेदी करण्यास तयार आहेत; पण त्यातही निकष लावल्याने कापूस विकावा की नाही, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस