शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे भाव वाढण्याचे संकेत!

By admin | Updated: November 22, 2014 23:34 IST

देशात आतापर्यंत २0 लाख गाठींची खरेदी.

अकोला: देशात चालू हंगामात आतापर्यंत कापसाची सर्वाधिक खरेदी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ने केल्याचा, खासगी बाजारावर परिणाम झाल्याने, खासगी व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी सुरू केल्यामुळे, कापसाचे दर वाढण्याचे संकेत मिळत आहेत. देशात आतापर्यंंत २0 लाख गाठी कापूस खरेदी झाला असून, त्यापैकी सर्वाधिक कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. महाराष्ट्रात यावर्षी सुमारे ८0 लाख गाठी कापसाचे उत्पादन अपेक्षित असून, शेतकर्‍यांनी कापूस विक्रीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास दीड लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे. यावर्षी सीसीआयचा अभिकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ राज्यात प्रथमच कापसाची खरेदी करीत आहे. पणन महासंघाने राज्यात आणि सीसीआयने देशात थेट कापूस खरेदीचा धडाका लावला आहे. राज्यात आतापर्यंंत खरेदी करण्यात आलेल्या दीड लाख गाठींपैकी सुमारे ७0 ते ७५ टक्के कापूस एकट्या सीसीआयने खरेदी केला आहे. उर्वरित २५ ते ३0 टक्के कापूस खासगी व्यापार्‍यांनी खरेदी केला आहे. सीसीआय कापसाची खरेदी करीत असल्याने, खासगी बाजारात कापसाचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील जवळपास सर्वच कापूस उद्योजक, व्यापार्‍यांनी कापूस खरेदी करण्यास सुरू वात केली असल्याने, नजिकच्या काळात कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. यावर्षी कापूस खरेदीबाबत, केंद्र सरकारचा राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड)शी करार न झाल्याने, कापूस खरेदी कोण करणार, या प्रतीक्षेत कापूस खरेदीला विलंब झाला. शेवटी राज्यात सीसीआयचा अभिकर्ता म्हणून पणन महांसघ हमी दराने कापूस खरेदी करेल असा निर्णय झाल्यानंतर, १५ नोव्हेंबर रोजी पणन महासंघाने राज्यात ३0 ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. कापसाची आवक वाढत गेल्याने खरेदी केंद्राची संख्या ७0 पर्यंंत वाढविण्यात येत आह; पण कापसाचे हमी दर प्रति क्विंटल ३९00 ते ३९५0 पर्यंंत असल्याने, शेतकर्‍यांची कोंडी होत आहे; परंतु आता व्यापार्‍यांनीही कापूस खरेदीस सुरुवात केल्याने, बाजारात स्पर्धा निर्माण होऊन, कापसाचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.-बाजारातील प्रति क्विंटल दर ३९७५ शासकीय खरेदीचे हमी दर ३९00 ते ३९५0 रू पये प्रति क्विंटल असून, खासगी बाजारात ३९७५ रू पये प्रति क्विंटल भाव आहेत. व्यापार्‍यांनी पूर्ण क्षमतेने कापूस खरेदी सुरू केल्यास, भाव चार हजाराच्या वर जाण्याची शक्यता, व्यापारी वतरुळात वर्तविण्यात येत आहे.