शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे दर दोनशे रुपयांनी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:26 IST

अकोला: यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असताना राज्यातील कापसाचे दर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाले आहे.

अकोला: यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असताना राज्यातील कापसाचे दर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत देशात दररोज १ लाख ५० हजार, तर राज्यात ३५ हजार गाठींची आवक सुरू आहे.यावर्षी कापूस पीक पेरणीवर परिणाम झाला असून, राज्यात १० टक्के कापसाचे क्षेत्र घटले आहे. या परिस्थितीत राज्यात सध्या तरी दररोज १ लाख ७५ हजार क्विंटल (३५ हजार गाठी) कापसाची आवक सुरू आहे. अनेक भागात कापूस वेचणी आता संपण्याच्या मार्गावर आहे. पाऊस कमी झाल्याचा परिणाम कापूस पिकांवर झाला आहे. पश्चिम विदर्भात शेकडो शेतकºयांनी कापसावर नांगर फिरवला असून, अनेक ठिकाणी कापसाची एक वेचणी झाल्यानंतर कापूस पीक संपले. भारी व काळ््या जमिनीत कापूस टिकून आहे. तथापि, तेथेही शेवटची कापसाची वेचणी आहे. त्यामुळे बाजारात कापसाची सध्या जी आवक आहे ती अशीच राहील, असे सांगता येत नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. असे असताना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये वाढलेले दर अचानक २०० ते ३०० रुपयांनी कमी झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. पश्चिम विदर्भातील अकोट बाजारात सध्या हे दर घटून प्रतिक्विंटल ५,७०० ते ५,८०० रुपयांपर्यंत आहेत. काही भागात हेच दर ५,५०० ते ५,६५० रुपयांपर्यंत घटले आहेत.

 

कापसाची आवक सध्या राज्यात ३५ हजार गाठी आहे; पण दर दोन दिवसात २०० रुपयांची घटले आहेत. एक-दोन दिवसानंतर यात काय बदल होतो, त्यानंतरच पुढील दर काय असतील, हे कळेल.- बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस