शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे दर प्रतिक्विंटल पाच हजार होण्याची शक्यता!

By admin | Updated: April 20, 2015 01:43 IST

शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद.

अकोला : खासगी बाजारात कापसाचे दर वाढत असून, हे दर प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यन, शेतकर्‍यांजवळील कापूस संपल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्रंही बंद करण्यात आली आहेत. राज्यात आतापर्यंत ७0 लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे. यावर्षी कापूस खरेदी केंद्र लवकर सुरू न झाल्याने आर्थिक गरजेपोटी सुरुवातीला अल्पभूधारक शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना कापूस विकला आहे. राज्यात आतापर्यंत ७0 लाख गाठी कापूस शेतकर्‍यांनी विकला असून, यातील ८0 लाख क्विंटल, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केला आहे आणि तेवढाच कापूस व्यापार्‍यांनी खरेदी केला आहे. कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी २८ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. एप्रिल महिना लागताच कापसाचे दर वाढले असून, सध्या बाजारात ४,६५0 ते ४,७00 रुपये प्रतिक्विंटल दर सुरू आहेत. या महिन्यातच यामध्ये आणखी वृद्धी होण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने यावर्षी कापसाचे हमी दर ४0५0 ते ३९५0 प्रतिक्विंटल जाहीर केले होते. तथापि महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना प्रतवारीचे निकष लावून ३८00 ते ३९00 रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळ आणि महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी केला आहे. खासगी बाजारात याच कापसाला आता ४७00 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. आता तर शेतकर्‍यांजवळील कापूस जवळपास संपत आला आहे. काही मोजक्याच सधन शेतकर्‍यांकडे कापूस असण्याची शक्यता आहे. दरम्यान, कापूस उत्पादक पणन महासंघाने खरेदी पूर्णत: बंद केली आहे. भारतीय कापूस महामंडळाने मात्र कापूस खरेदीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. बाजारातील कापसाचे दर कमी झाल्यास हमी दराने सीसीआय कापूस खरेदी करण्यास तयार असल्याचे वृत्त आहे.