शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणी यंत्र तयार करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:43 IST

स्मार्ट’मधून निधी प्राप्त झाल्यास या कृषी विद्यापीठाला हे यंत्र तयार करू न त्याचा व्यावसायिक म्हणून विकास करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसून, वेचणीचा खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणी यंत्राची प्रतीक्षा आहे. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हे यंत्र विकसित करण्यासाठीचे पाऊल उचलले आहे. शासनाच्या ‘स्मार्ट’ महाराष्टÑ राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत यंत्रासाठी निधीची तरतूद असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.राज्यात ४३ लाख हेक्टरवर कापसाचे क्षेत्र आहे. यादृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे यांच्या कार्यकाळात कापूस वेचणी यंत्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर व भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीने यासाठी निधी उपलब्ध केला होता. श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत यंत्र विकासासाठी करारही करण्यात आला होता. यंत्राचे ५० टक्के कामही पूर्ण झाले होते. याअगोदर नामांकित कंपन्यांच्या यंत्राद्वारे कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर वेचणी प्रात्यक्षिकही घेण्यात आले. तथापि, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने नंतर याकडे दुर्लक्ष झाले; परंतु आता मजुरांची वानवा व वाढलेले मजुरीचे दर बघता, या यंत्राची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने डॉ. मायंदे यांनी यंत्रासंबंधीचा प्रकल्प शासनाला सादर केला आहे. यासाठी अनुदान, निधीची गरज आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत निधीची तरतूद आहे. ‘स्मार्ट’मधून निधी प्राप्त झाल्यास या कृषी विद्यापीठाला हे यंत्र तयार करू न त्याचा व्यावसायिक म्हणून विकास करता येणार आहे. कापूस वेचणीचे दर सध्या १० रुपये किलोपेक्षा जास्त आहेत. हे यंत्र तयार झाल्यास शेतकऱ्यांचा कापूस वेचणी खर्च अर्धा होईल, असे डॉ. मायंदे यांचे म्हणणे आहे.दरम्यान, कापूस वेचणी करण्यासाठी कापूस पेरणीची पद्धत बदलावी लागणार असून, ७० टक्के कापूस एकाच वेळी वेचता यावा, तसे नियोजन करावे लागणार आहे. नवीन यंत्रामध्ये केवळ कापूसच वेचणी करता यावी, असे सेंसर लावण्यात येईल. त्यासाठी कापूस बियाणे संशोधनही करावे लागणार आहे. विदेशात मजूर नसल्याने यंत्राने कापूस वेचणी करण्यात येते. तथापि, त्यांच्याकडे एकाच वेचणीत कापूस काढला जातो. कापूस परिपक्क झाल्यानंतर त्यावर विशिष्ट प्रकारची औषधी फवारणी करू न पानगळ केली जाते. त्यानंतर यंत्राणे कापूस वेचणी करण्यात येते.

कापूस वेचणी यंत्र विकसित करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. विविध कंपन्यांसोबत यासंबंधी चर्चा झाली आहे. निधीची पूर्तता होताच काम हाती घेण्यात येणार आहे.- डॉ. विलास एम. भाले, कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ