शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कापूस पणन महासंघ राहणार उपअभिकर्ताच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:57 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने स्वतंत्र कापूस खरेदीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे; परंतु शासनाने अद्याप या प्रस्तावावर विचार न केल्याने यावर्षीही पणन महासंघाला भारतीय कापूस महामंडळाचाच उप अभिकर्ता म्हणून कापूस खरेदी करावी लागणार आहे. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी पणन महासंघाच्या नवीन संचालक मंडळाची पहिली आमसभा मुंबईत आहे. या सभेला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. आमसभेत हा मुद्दा समोर येणार आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र कापूस खरेदीचा प्रस्ताव शासनाला सादरआज मुंबईत आमसभानोडल एजन्सी दिल्यास शेतकर्‍यांचा फायदा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने स्वतंत्र कापूस खरेदीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे; परंतु शासनाने अद्याप या प्रस्तावावर विचार न केल्याने यावर्षीही पणन महासंघाला भारतीय कापूस महामंडळाचाच उप अभिकर्ता म्हणून कापूस खरेदी करावी लागणार आहे. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी पणन महासंघाच्या नवीन संचालक मंडळाची पहिली आमसभा मुंबईत आहे. या सभेला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. आमसभेत हा मुद्दा समोर येणार आहे.शेतकर्‍यांची संस्था असलेल्या पणन महासंघामार्फत सुरुवातीच्या काळात कापूस एकाधिकार योजना राबविण्यात आली. कापूस खरेदीमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी, हमी दरापेक्षा शेतकर्‍यांना जास्त दर मिळावे, याकरिता हा एकाधिकार नंतर बंद करण्यात आला. डॉ.एन.पी. हिराणी यांच्या अध्यक्षपदाचा हा कार्यकाळ होता. या काळात शेतकर्‍यांचा भागभांडवल स्वरू पात जमा असलेला तीन टक्के निधी म्हणजेच सातशे पन्नास कोटी रुपये शेतकर्‍यांना परत करण्यात आले आहेत. कापूस खरेदीनंतर मिळालेल्या नफ्यातून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना बोनस दिले जात होते. शेतकर्‍यांना बोनस देणे तर केव्हाचेच बंद झाले असून, मागील काही वर्षांपासून पणन महासंघाला प्रचंड अवकळा आली आहे. हमी दरापेक्षा बाजारात जास्त दर मिळत असल्याने पणनला शेतकर्‍यांनी कापूस विकणे बंद केले आहे. असे असले, तरी पणन महासंघ कापूस दराबाबत नियंत्रण भिंत आहे. त्यामुळे एखादे वर्ष अपवाद ठरले तर इतर वेळा शेतकर्‍यांना हमी दरापेक्षा जास्त दर मिळाले आहे. दरम्यान, कापूस एकाधिकार खरेदी बंद झाल्यानंतर सुरुवातीला नाफेडने कापूस पणन महासंघाला या राज्यात कापूस खरेदीसाठी उपअभिकर्ता म्हणून नेमणूक केली होती. तथापि, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने दोन वर्षांपासून नाफेडऐवजी भारतीय कापूस महामंडळाला (सीसीआय)नोडल एजन्सी दिलेली आहे. सीसीआनेही पणन महासंघाला उपअभिकर्ता नेमले आहे; परंतु उपअभिकर्ता म्हणून काम करताना पणन महासंघाचा इतर खर्च भागवणे अशक्य असल्याने  पणन महासंघाने थेट मुख्य अभिकर्ता (नोडल एजन्सी) म्हणून कापूस खरेदीची परवानगी देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव मागच्या वर्षीच्या आमसभेत घेतला होता. तो प्रस्ताव शासनाला देण्यात आला आहे.

नोडल एजन्सी दिल्यास शेतकर्‍यांचा फायदास्वतंत्र कापूस खरेदीची परवानगी दिल्यास सीसीआयसारखा पणन महासंघाला बाजार भावाने कापूस खरेदी करता येईल. जो नफा येईल तो शेतकर्‍यांना वाटप करता येईल, असा पणन महासंघाच्या तत्कालीन संचालक मंडळाचा दावा होता. नवे संचालक मंडळही या बाबतीत नव्याने प्रस्ताव देणार असल्याचे वृत्त आहे.

राज्यातील शेतकर्‍यांना कापसाचे पूरक दर मिळावे, तसेच महासंघाचा इतर खर्च भागवता यावा, त्यासाठीच कापूस खरदेसाठीची स्वतंत्र नोडल एजन्सी देण्याचा प्रस्ताव घेतला होता. सदर प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे.- डॉ.एन.पी. हिराणी, माजी अध्यक्ष,सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ