शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेच्या निकषात हवी सुधारणा - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 14:28 IST

२४ तासांत पीक नुकसानाचे पंचनामे करणे आणि ४८ तासांत पीक नुकसान भरपाई शेतकºयांना मिळाली पाहिजे.

- संतोष येलकरअकोला : पीक विमा योजना त्रुटीपूर्ण असल्याने, शेतकऱ्यांचा आक्रोश कमी करण्यासाठी सरकारने पीक विमा योजनेच्या निकषात सुधारणा करण्याची गरज आहे, असे मत वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.दुष्काळी परिस्थिती असूनही बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी पीक विम्याच्या निकषात तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये सिंचन सुविधा असलेल्या शेतकºयांसाठी आणि कोरडवाहू शेतकºयांसाठी पीक विमा योजनेत वेगवेगळे निकष ठरविण्याची गरज आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक नुकसान भरपाईसाठी २४ तासांत पीक नुकसानाचे पंचनामे करणे आणि ४८ तासांत पीक नुकसान भरपाई शेतकºयांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारची सुधारणा सरकारने पीक विमा योजनेच्या निकषात करणे आवश्यक आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले. सरकारमार्फत सध्या राबविण्यात येत असलेली पीक विमा योजना त्रुटीपूर्ण असल्याने, यासंदर्भात शेतकºयांचा आक्रोश कमी करण्यासाठी पीक विमा योजनेच्या निकषात सुधारणा केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.महसूल मंडळ नव्हे, गाव घटक समजावे!पीक विमा योजनेत पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना पीक विम्याच्या लाभासाठी पात्र ठरविण्याकरिता महसूल मंडळनिहाय क्षेत्र घटक म्हणून समजण्यात येते; मात्र शेतकºयांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यासाठी महसूल मंडळ नव्हे, तर गावनिहाय क्षेत्र हा घटक समजण्यात यावा, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kishor Tiwariकिशोर तिवारीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती