शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरील नागरीकांच्या उपचारासाठी नगरसेवक सरसावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:46 IST

नदी काठावरील स्थानिक रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी भाजपाचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेविका जान्हवी डोंगरे यांनी पुढाकार घेत सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देमनपा झोपेतनगरसेवकांच्या सूचनेवरून आरोग्य शिबिराचे आयोजन

अकोला : मोर्णा नदीपात्रात वाढलेली जलकुंभी व तुंबलेल्या सांडपाण्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. नदी काठावरील स्थानिक रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी भाजपाचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेविका जान्हवी डोंगरे यांनी पुढाकार घेत सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. वातावरणातील बदलामुळे शहरात ‘व्हायरल फिवर’ची साथ पसरली आहे. यात भरीस भर मोर्णा नदीच्या पात्रातील जलकुंभीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. प्रभाग क्रमांक १२ अंतर्गत येणार्‍या मोर्णा नदी काठावरील अनिकट परिसर, कमला नेहरू नगर भागातील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे हातपाय सुजणे, ताप येणे, खोकला, सर्दी, अंगदुखी अशा आजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच भाजपाचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेविका जान्हवी डोंगरे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या मदतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. कमलानगर येथील व्यायाम शाळेत आयोजित शिबिरात असंख्य लोकांनी सहभाग नोंदविला. मनपाच्यावतीने त्यांना औषधीचे वितरण करण्यात आले.   

आरोग्य विभाग करतो तरी काय? प्रभाग १२ अंतर्गत अनिकट भागातील नागरिक आजारामुळे हैराण झाल्याचे समजताच भाजपाच्या नगरसेवकांनी पुढाकार घेत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. तत्पूर्वी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने या परिसराची पाहणी केली असता, नागरिक आजारी असल्याचे समोर आले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असताना हा विभाग एरव्ही कोणते कर्तव्य बजावतो, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.