शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

नगरसेवक ते आमदार

By admin | Updated: October 25, 2014 01:07 IST

व्यापार करता-करता गोवर्धन शर्मा झाले राजकारणी

डॉ. किरण वाघमारे / अकोलाअकोला पश्‍चिममधून पाचव्यांदा विजय मिळविणारे भाजपचे गोवर्धन शर्मा ऊर्फ लालाजी हे उच्चशिक्षित आहेत. बी.कॉम. पर्यंंत शिक्षण झालेल्या गोवर्धन शर्मा यांचा व्यवसाय आहे. न्यू क्लॉथ मार्केटमध्ये त्यांचे कपड्याचे दुकान असून आपला परंपरागत व्यवसाय सांभाळून त्यांनी नगरसेवक ते आमदारपर्यंतचा प्रवास केला आहे. गोवर्धन शर्मा महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते. वडील मांगीलाल शर्मा यांच्या माध्यमातून त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेत. नंतर ते संघाच्या शाखेत दाखल झाले. संघ स्वयंसेवक म्हणून त्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे. त्यांचे वडील मांगीलाल शर्मा हे जनसंघाचे कार्यकर्ते होते. वडील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून गोवर्धन शर्मा यांची जडण-घडण झाली.महाविद्यालयातील जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गोवर्धन शर्मा यांनी आपले नेतृत्व गुण प्रकट केले. विद्यार्थ्यांंना संघटित करून त्यांच्यात राष्ट्र प्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न लालाजी करीत असत. सगळ्यांना आपलेसे करण्याची कला त्यांच्यात ठासून भरली होती. जाती-धर्माचा भेद न करता ते विद्यार्थ्यांंना एकात्मतेच्या धाग्यात जोडण्याचे काम करीत असत. हेच गुण पुढे त्यांना राजकारणात कामी आले. वडिलांच्या निधनानंतर १९८0 मध्ये लालाजी राजकारणात आले. सुरुवातीपासूनच संघाचे संस्कार असल्यामुळे लालाजींनी जनसंघात प्रवेश केला. सुरुवातीला लालाजी जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात राहत होते. मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होत असत. यातूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले. पुढे ते हा भाग सोडून आळशी प्लॉट परिसरात राहण्यास आले. याच वर्षी त्यांनी आळशी प्लॉट येथून विठ्ठल मंदिर असलेल्या वार्डामधून निवडणूक लढविली आणि त्यांनी ही निवडणूक जिंकली. गोवर्धन शर्मा यांनी भाजपात प्रवेश केला व भाजपात संघटनेंतर्गत विविध पदे त्यांनी भूषविली. १९८५ ते १९९५ या काळात शर्मा हे नगरसेवक होते. १९९५ मध्ये नगरसेवक असतानाच गोवर्धन शर्मा यांनी अकोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि पहिल्याच प्रयत्नात जिंकली. त्यानंतर १९९५ पासून ते सातत्याने अकोला पश्‍चिम मतदारसंघातून विजयी होत आहेत. युती शासनाच्या काळात पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री म्हणूनदेखील गोवर्धन शर्मा यांनी भूमिका बजावली. पक्ष देईल ती जबाबदारी लालाजींनी पार पाडली. कुठलाही गट-तट न बाळगता त्यांनी सर्वांना सोबत घेऊन व सर्वांंचा सल्ला ऐकत काम केले. मंत्रिपद त्यांना फारसे मानवले नाही. त्यांनी राजीनामा दिला व ते आमदार म्हणून कार्यरत राहिले. उत्कृष्ट कबड्डीपटू असलेले गोवर्धन शर्मा हे पक्षांतर्गत विरोधक व इतर पक्षांच्या विरोधकांना मात देण्यात सातत्याने यशस्वी ठरले आहेत.