शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा खेळखंडाेबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

पावसाळ्यात नैसर्गिक संकटाची शक्यता लक्षात घेता मनपाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाने सज्ज असणे अपेक्षित आहे. याठिकाणी नेमका उलटा प्रकार ...

पावसाळ्यात नैसर्गिक संकटाची शक्यता लक्षात घेता मनपाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाने सज्ज असणे अपेक्षित आहे. याठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येत आहे. १८ मे राेजी शहरात वादळामुळे माेठ्या प्रमाणात वित्त हानी झाली हाेती. त्यावेळी अग्निशमन विभागाच्या मर्यादा समाेर आल्या हाेत्या. त्यानंतर या विभागाने प्रभावी उपाययाेजना करण्याची गरज असताना हा विभाग कमालीचा गाफील असल्याचा अनुभव खुद्द माजी महापाैर विजय अग्रवाल यांना आला आहे. ही बाब गंभीरतेने घेत महापाैर अर्चना मसने यांनी आयुक्त अराेरा यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांसाेबत बैठकीत चर्चा केली. बैठकीत माजी महापौर अग्रवाल, सभापती संजय बडोणे, सभागृहनेता याेेगिता पावसाळे, नगरसेविका उषा विरक, उपायुक्‍त डॉ. पंकज जावळे, सहा. आयुक्‍त पूनम कळंबे, माजी नगरसेवक जयंत मसने, क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, विठ्ठल देवकते, देवीदास निकाळजे, राजेंद्र टापरे, अग्निशमन विभागाचे मनीष कथले आदींची उपस्थिती होती.

साहित्याची खरेदी करा !

आपातकालीन परिस्थितीवर मात करण्‍यासाठी अग्निशमन विभागाने तातडीने आवश्यक साहित्याची खरेदी करण्याचे निर्देश महापाैरांनी दिले. यामध्ये कटर, पंप, इन्व्‍हर्टर, जनरेटर, हॅण्‍ड ग्‍लोज, गम बूट, टॉर्च, डिझेल पंप यासह इतर साहित्यांचा समावेश आहे.

चार वर्षांनंतर पाेकलेन खरेदीचा प्रस्ताव

नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवरील कचरा बाजूला करण्यासाठी २०१७ मध्ये सत्तापक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या मर्जीने पाेकलेन मशीन भाडेतत्त्वावर नियुक्त केली हाेती. या माेबदल्यात आजवर प्रशासनाने ४ काेटी रुपयांपेक्षा अधिक देयक अदा केले आहे. चार वर्षांनंतर मनपाने नवीन पाेकलेन मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव महापाैरांनी या बैठकीत मांडला, हे येथे उल्लेखनीय.