शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

६.५३ कोटींच्या शिलकीसह ५५७ कोटींचा मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 10:54 IST

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे चालू आर्थिक वर्षात मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होण्याची दाट शक्यता असताना सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने ...

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे चालू आर्थिक वर्षात मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होण्याची दाट शक्यता असताना सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधणे अपेक्षित होते. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात याचा साधा लवलेशही आढळून आला नाही. सत्तापक्षानेसुद्धा उत्पन्न वाढीवर चुप्पी साधत २०२०-२१ या वर्षासाठी ६.५३ कोटींच्या शिलकीसह ५५७.३७ कोटींच्या अर्थसंकल्पाला सभेत महापौर अर्चना मसने यांनी मंजुरी दिली.कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे या उद्देशातून महापालिक ा प्रशासनाच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली. त्याचा परिणाम मनपाच्या अर्थसंकल्पावर होऊन कारभार प्रभावित झाला. एक जूननंतर टाळेबंदी शिथिल केल्यानंतर स्थायी समितीने मूळ अंदाजपत्रकात दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या सभेमध्ये स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी अर्थसंकल्पाचे थोडक्यात वाचन करून मनपाच्या एकूणच आर्थिक परिस्थितीवर आणि खर्चावर प्रकाशझोत टाकला. प्रशासनाने २०२० मधील सुरुवातीची अपेक्षित शिल्लक १०.३६ कोटी रुपये, अपेक्षित उत्पन्न (मनपासह विविध योजनांद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न) ५४७ कोटी रुपये गृहीत धरून ५५७.३७ कोटींचे उत्पन्न सादर केले. त्यामधून एकूण अपेक्षित खर्च ५५०.८४ कोटी रुपये झाल्यानंतर ६.५३ कोटींची रक्कम शिल्लक राहत असल्याचे मनपाचे मुख्य लेखा परीक्षक मनजित गोरेगावकर यांनी नमूद केले. या शिलकीमध्ये मनपा निधीतून २.६९ कोटी रुपये अपेक्षित आहेत. प्रशासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पात उत्पन्न वाढीसंदर्भात कोणत्याही तरतुदी न करता सत्ताधारी भाजपने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली, हे येथे उल्लेखनीय.अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्हस्थायी समितीने मूळ अंदाजपत्रकात २२ कोटींच्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या. या रकमेचा अर्थसंकल्पात समावेश न करता प्रशासनाने मूळ अंदाजपत्रक सादर केले कसे, असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.भाजप नगरसेवकांच्या चुप्पीवर प्रश्नचिन्हअर्थसंकल्पीय सभेत सत्तापक्षासह विरोधी पक्षातील नगरसेवकांकडून शहराच्या सर्वांगीण विकासावर चर्चा अपेक्षित होती. सभागृहात माजी महापौर विजय अग्रवाल, सभापती सतीश ढगे, नगरसेवक हरीश काळे, विनोद मापारी वगळता इतर नगरसेवकांनी चुप्पी साधल्याचे दिसून आले. अमृत योजनेतील कामे निकाली काढण्यासाठी निधीची गरज भासल्यास कर्ज घेण्याची गरज असल्याची सूचना अग्रवाल यांनी केली.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला