शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा पुन्हा रस्त्यावर उतरून करणार जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 19:37 IST

मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकारी व आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करा, असे निर्देश दिले.

अकोला : महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याचे समोर आले असून, मंगळवारी आणखी ७८ रुग्णांची भर पडली असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पृष्ठभूमीवर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकारी व आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करा, असे निर्देश दिले.जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण एप्रिल महिन्यात मनपा क्षेत्रात आढळून आला होता. त्यानंतर शहराच्या कानाकोपऱ्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र समोर आले होते. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र कामाला लागली होती. झोन अधिकारी, मालमत्ता कर वसुली विभागातील वसुली निरीक्षक, शिक्षक तसेच आशा सेविका सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे अकोला शहर कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर होते. शहरानंतर ग्रामीण भागाकडे कोरोनाने मोर्चा वळविला होता; मात्र आता पुन्हा एकदा ग्रामीणसह शहरातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. याकरिता आयुक्त संजय कापडणीस यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन थेट लोकांमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे. अनलॉकमुळे नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यांना थांबविता येणार नाही; मात्र प्रत्येकाने सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठीच आता जनजागृतीची मोहीम होती घेऊन कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचा बडगाही उचलण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका