शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या श्वानांच्या बंदाेबस्तासाठी मनपा सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:19 IST

Akola Municipal Corporation : भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व रॅबिज लसीकरणाचा निर्णय घेत मंगळवारपासून प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

अकोला : शहरातील मोकाट श्‍वानांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्यांचा जीव धाेक्यात सापडला हाेता. वाहनांच्या मागे धावणाऱ्या श्वानांमुळे नागरिक जेरीस आले हाेते. तसेच पिसाळलेल्या श्वानांनी चावा घेतल्यामुळे अकाेलेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. एकूणच परिस्थिती लक्षात घेता मनपा प्रशासनाने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व रॅबिज लसीकरणाचा निर्णय घेत मंगळवारपासून प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

रस्त्यांवर झुंडीने ठिय्या मांडणाऱ्या माेकाट श्वानांमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. त्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाकडून उपाययाेजना केल्या जात असल्या तरी त्या प्रभावी ठरत नसल्याने भटक्या श्वानांची समस्या कायम आहे. २०१६ मध्ये मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी सर्वप्रथम माेकाट श्वानांच्या निर्बीजीकरणाचा निर्णय घेतला हाेता. त्यासाठी पशुवैद्यकीय मत्स्य व विज्ञान पदव्युत्तर संस्थेसाेबत करार करण्यात आला हाेता. याठिकाणी दरराेज चार माेकाट श्वानांचे निर्बीजीकरण केले जात हाेते. दरम्यान, आयुक्त निमा अराेरा यांनी श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाेबतच त्यांना रॅबिज लस देण्याच्या अनुषंगाने निविदा प्रसिध्द केली. यामध्ये सोसायटी फॉर ॲ्रनिमल प्रोटेक्‍शन (सॅप) कोल्‍हापूर, कम्‍पेशन फॉर ॲनिमल्‍स ॲण्‍ड प्रोटेक्‍शन सोसायटी (कॅप्‍स) अकोला यांच्‍यासाेबत करारनामा करण्यात आला. अशा श्वानांना पकडण्याच्या माेहिमेला मंगळवारपासून रामदासपेठ भागात प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुमारे १५ श्वान पकडण्यात आले आहेत.

 

या ठिकाणी हाेणार शस्त्रक्रिया

हाेमगार्ड कार्यालयाजवळील मनपा शाळा क्रं.२ येथे तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत श्वानांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी ॲन्‍टि रॅबिज लस देण्‍यात येईल. या ठिकाणी श्वानांना दाेन दिवस चमूच्‍या देखरेखीखाली ठेवून त्‍यांना ज्‍या ठिकाणाहून आणले पुन्हा त्याच भागात सोडण्यात येईल.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला