शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मनपा प्रशासनाने व्यावसायिकांना बजावला १ लाखाचा दंड

By admin | Updated: July 21, 2015 01:11 IST

हॉटेल व्यावसायिकांची महापौर, जिल्हाधिका-यांकडे धाव

अकोला : हॉटेलमध्ये अपेक्षित साफसफाई आढळल्यानंतर सर्व्हिस लाईनमध्ये अस्वच्छता पसरविल्याची सबब पुढे करीत महापालिकेच्या प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी सोमवारी राठी पेडेवाला या प्रतिष्ठानच्या मालकाला तब्बल १ लाख रुपये तर गुजराथी उपाहारगृहाच्या संचालकांना ४0 हजार रुपयांचा दंड आकारला. जोपर्यंत धनादेश मिळत नाही, तोपर्यंत हॉटेलमधून बाहेर निघणार नसल्याचा धमकीवजा इशारा मडावींनी दिल्यानंतर धनादेश दिल्याचे राठी पेडेवालाच्या संचालकांनी सांगितले. याप्रकरणी संतप्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांनी महापौरांसह जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन प्रशासनाच्या हिटलरशाहीचा पाढा वाचला. मनपाच्या गंगाजळीत वाढ करण्याच्या नावाखाली तत्कालीन उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरातील खाद्यपेय विक्रेता, हॉटेल व्यावसायिक यांच्या प्रतिष्ठानांची तपासणी करीत एक-एक लाख रुपये दंड आकारण्याची मोहीम सुरू केली होती. अतिक्रमणाच्या नावाखाली हॉटेलमधील खाद्यपदार्थांची चक्क रस्त्यावर फेकफाक करण्यापर्यंत चिंचोलीकरांनी मजल गाठली होती. यामुळे चिंचोलीकर यांना अकोलेकरांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला होता. नेमका तसाच प्रकार प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी सुरू केल्याचे समोर आले आहे. हॉटेलमध्ये अपेक्षित साफसफाई आढळल्यानंतर हॉटेलमुळे सर्व्हिस लाईनमध्ये अस्वच्छता परसरल्याची सबब पुढे करीत मडावी यांनी राठी पेडेवालाचे संचालक श्रीकृष्णकुमार राठी यांना तब्बल १ लाख रुपयाचा दंड आकारला. रतनलाल प्लॉटस्थित गुजराथी उपाहारगृहाचे संचालक दिनेश मेहता यांना हॉटेलमधील अस्वच्छताप्रकरणी ४0 हजारांचा दंड आकारला. जोपर्यंत दंडाच्या रकमेचा धनादेश मिळत नाही, तोपर्यंंत हॉटेलमधून बाहेर निघणार नसल्याचा इशारा मडावी यांनी दिला. त्यामुळे धनादेश दिल्याचे राठी यांनी सांगितले. याप्रकरणी अकोला जिल्हा सर्व खाद्यपेय विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल,सचिव दीपक वोरा यांच्यासह असंख्य व्यावसायिकांनी महापौर उज्ज्वला देशमुख, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. याविषयी मडावी यांना संपर्क साधला असता,त्यांनी प्रतिसाद दिला नाही.