शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

CorornaVirus : मनपाची आरोग्य यंत्रणा आता नागरिकांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:18 IST

नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्रपणे चार वैद्यकीय पथकांचे गठण केले आहे.

अकोला: महापालिका क्षेत्रात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘कंटेनमेंट झोन’मधील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्रपणे चार वैद्यकीय पथकांचे गठण केले आहे. उद्यापासून ही पथके नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करतील.शहराच्या बैदपुरा परिसरामध्ये कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण ७ एप्रिल रोजी आढळून आला होता. या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे उशिरा आढळून येईपर्यंत या भागात कोरोनाचा चांगलाच फैलाव झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, मनपा प्रशासनाने पहिला रुग्ण आढळून येताच हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला.यावेळी संशयित रुग्ण व त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेत असताना विविध अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या कालावधीत बैदपुरा, मोमीनपुरा, ताजनापेठ, फतेह अली चौक, कलाल की चाळ, माळीपुरा, गवळीपुरा, सराफा बाजार, मोहम्मद अली रोड या भागांमध्ये कोरोना विषाणूने हात-पाय पसरल्याचे समोर आले. संशयित रुग्णांचे नमुने तातडीने न घेतल्यास कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी किसनीबाई भरतीया रुग्णालयात संशयित रुग्णांचे नमुने घेण्याला प्रारंभ करताच कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे अहवालाअंती समोर आले. यादरम्यान, पालकमंत्री बच्चू कडू यांनी ‘कंटेनमेंट झोन’मधील परिस्थितीचा आढावा घेतला असता कोरोनाचे उगमस्थान असलेल्या भागांमध्ये आरोग्य तपासणी वाढविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्या निर्देशानुसार मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त वैभव आवारे यांनी नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी पथकांचे नियोजन केले. आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला मनपा सहा. आयुक्त पूनम कळंबे, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, संदीप गावंडे, विठ्ठल देवकते, विजय पारतवार, राजेंद्र टापरे, मनपाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख, डॉ. प्रभाकर मुदगल व डॉ. अस्मिता पाठक यांची उपस्थिती होती.पाच हजार कुटुंबांची तपासणीकोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या बैदपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, माळीपुरा व गवळीपुरा या चार परिसरातील सुमारे पाच हजार कुटुंबांना मनपाचे वैद्यकीय अधिकारी भेट देणार आहेत. नागरिकांच्या घरी जाऊन मधुमेह, दुर्धर आजार, दमा तसेच हृदयाशी संबंधित आजारांची तपासणी करण्यात येईल.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका