शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आणखी दोन बळी; पाच नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १०५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 11:35 IST

सोमवार, २० जुलै रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देआणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकूण बाधितांची संख्या २,१४० वर गेली आहे.३०६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असतानाही या संसर्गजन्य आजाराचा हैदोस सुरुच असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवार, २० जुलै रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तर आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०५ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या २,१४० वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी सकाळी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे १९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, हे रुग्ण अकोल्यातील जुने शहर, केशव नगर, जेल क्वॉर्टर, खेतान नगर व जीएमसी येथील आहेत. दरम्यान, रविवारी रात्री रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये आणखी एक जण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोला शहरातील दोघांचा मृत्यूरविवारी रात्री अकोला शहरातील दोन पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी एक ६० वर्षीय पुरुष गुलजार पुरा भागातील असून, दुसरा ६६ वर्षीय पुरुष लक्ष्मीनगर भागातील आहे. या दोघांनाही ११ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.३०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१४० असून, यापैकी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३०६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या