शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोल्यात कोरोनाचे आणखी दोन बळी; मृतकांचा आकडा २३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 11:48 IST

मंगळवारी मृत्यू झालेल्यांमध्ये नायगाव येथील ५० वर्षीय महिला व बाळापूर रोड भागातील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

ठळक मुद्दे शुक्रवारी एकूण ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णसंख्या ३४९ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.शुक्रवारी रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अकोला : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात बाधितांच्या आकड्यासोबतच आता या विषाणूच्या बळींची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. कालपर्यंत मृतकांचा आकडा २१ होता. यामध्ये शुक्रवार, २२ मे रोजी आणखी दोघांची भर पडत तो आता २३ वर गेला आहे. मंगळवार, १९ मे रोजी मृत्यू झालेल्या दोघांचे अहवालासह शुक्रवारी एकूण ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी मृत्यू झालेल्यांमध्ये नायगाव येथील ५० वर्षीय महिला व बाळापूर रोड भागातील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज सकाळी आठ पॉझिटिव्ह अहवाल आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४९ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोल्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, दररोज मोठ्या संख्यने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३४१ होती. यामध्ये शुक्रवारी आठ जणांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून शुक्रवारी ९२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८४ अहवाल निगेटिव्ह असून, आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात तीन महिला व पाच पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे फिरदौस कॉलनी, तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २२ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. आतापर्यंत २०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १२० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.गुरुवारी १५ जणांना डिस्चार्जकोविड आजारातून सावरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शुक्रवारी रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना घरी तर दहा जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवले आहे.प्राप्त अहवाल-९२पॉझिटीव्ह-आठनिगेटीव्ह-८४आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-३४९मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२०६दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला