शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

CoronaVirus : आणखी दोघांचा मृत्यू; ३० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 10:19 IST

‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये दिवसभरात आठ जण तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २२ असे एकूण ३० जण पॉझिटिव्ह आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, १८ जुलै रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून प्राप्त ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये दिवसभरात आठ जण तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २२ असे एकूण ३० जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०२ झाला, तर एकूण बाधितांची संख्या २,०८७ झाली आहे. दरम्यान, आणखी १५ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारीदिवसभरात २२९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२१ निगेटिव्ह, तर आठ पॉझिटिव्ह आढळून आले. सकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेले चौघेही पुरुष असून, यामध्ये बोरगाव मंजू येथील तीन, तर अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील एकाचा समावेश आहे.सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या चार अहवालांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हे चारही रुग्ण मूर्तिजापूर येथील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अकोट येथील दोघांचा मृत्यूकोरोनामुळे शनिवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही अकोट येथील असून, त्यापैकी एक जण ७६ वर्षीय, तर दुसरा ५४ वर्षीय आहे. या दोन्ही रुग्णांना १० जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.

१५ जणांना डिस्चार्जशनिवारी दुपारनंतर कोविड केअर सेंटरमधून १०, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन व हॉटेल रिजेन्सीमधून दोन अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.

मृतकाची नोंदच नाही!मूर्तिजापूर तालुक्यातील जितापूर खेडकर येथील ७५ वर्षीय वृद्धाचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद नसल्यामुळे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या अहवालात एकूण मृतांचा आकडा १०१ दर्शविला आहे.

३०३ रुग्णांवर उपचार सुरूआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २,०८७ असून, यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १,६८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३०३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट: ५८० चाचण्यांमध्ये २२ पॉझिटिव्हदिवसभरातील ५८० रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. दिवसभरात अकोला मनपा हद्दीत २५ चाचण्या झाल्या. त्यात पाच जण पॉझिटिव्ह आले. अकोट येथे ५८ चाचण्या होऊन त्यात नऊ जण पॉझिटिव्ह आले. तेल्हारा येथे ७८ जणांच्या चाचण्यांपैकी दोघे पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे १९७ चाचण्यांपैकी चार जण पॉझिटिव्ह आले. बार्शीटाकळी येथे २७ चाचण्यांमध्ये दोघे पॉझिटिव्ह आले. मूर्तिजापूर येथे ७५ जणांची चाचणी केली. आतापर्यंत जिल्ह्यात १,९९२ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १२० जण पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरcorona virusकोरोना वायरस बातम्या