शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अकोल्यात आणखी दोघांचा बळी; ११ नवे पॉझिटिव्ह, मृतकांचा आकडा ३२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:36 IST

दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३२ वर गेला आहे.

ठळक मुद्दे११ रुग्णांची भर पडून हा आकडा ५८१ वर गेला आहे. आज सकाळी प्राप्त अहवालात पाच महिला व सहा पुरुष आहेत.शनिवार रात्री दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असून, रविवारी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३२ वर गेला आहे. तर रविवारी आणखी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्याही ५८१ झाली आहे. आतापर्यंत ४२३ जणांना आयसोलेशन कक्षातून डिस्जार्च देण्यात आल्यामुळे आता १२६ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या लक्षणीय गतीने वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सद्या कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट ठरला आहे. शनिवार, ३० मे पर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५७० होती. यामध्ये रविवारी आणखी ११ रुग्णांची भर पडून हा आकडा ५८१ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी एकूण १८ अहवाल प्राप्त झाले. याकीपै ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित सात अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात पाच महिला व सहा पुरुष आहेत. त्यात हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्रीनगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट, फिरदौस कॉलनी, जुनेशहर, तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. दरम्यान, शनिवार रात्री दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये एक व्यक्ती सुधीर कॉलनी सिव्हील लाईन येथील रहिवासी आहे. ३८ वर्षीय व्यक्तीला २७ मे रोजी दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेली दुसरी व्यक्ती बाळापुर येथील असून, ५४ वर्षीय या व्यक्तीला २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते. या दोघांचा काल रात्री मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने रविवारी जाहीर केले.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-५८१मयत-३२(३१+१),डिस्चार्ज-४२३दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला