शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘त्यांनी’ सांभाळली कोरोना रुग्णांच्या कक्षाच्या स्वच्छतेची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 10:10 IST

डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांच्या खांद्याला खांदा लावून हे ९ सफाई कामगार सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे अविरत सेवा देत आहेत.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना संसर्गित रुग्णांजवळ कुटुंबातील सदस्यदेखील जात नाही. त्या कक्षामध्ये रुग्णांची दररोज बेडशीट बदलणे, रुग्ण वापरातील शौचालय आणि स्नानगृहाची वारंवार स्वच्छता राखणे, कोरोना वॉर्ड परिसराचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची महत्त्वाची जबाबदारी सफाई कामगार सक्षमतेने पार पाडित आहेत. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९ सफाई कामगारांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकलेली असून, हे कोरोना योद्धा आपली जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत.कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढताच अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगारांची विशेष टीम तयार करीत त्यांना प्रशिक्षित करण्यात आले. जीएमसीचे सफाई कामगार सुपरवायजर नरेंद्र गोडाले यांच्या नेतृत्वात मनोज पवार, पिंटू पचेरवाल, सतीश गोडाले, तिलक गोहर, विजय सेवता, सागर थामेद, गोकुल निधाने, मनोज नकवाल असे नऊ योद्धे या टीममध्ये अहोरात्र सेवारत आहेत. या योद्ध्यांना आज पंधरा दिवस झालेत त्यांनी घराचे आणि कुटुंबीयांचे अद्याप तोंडदेखील पाहिलेले नाही. जीएमसीजवळच असलेल्या एका खासगी निवासस्थानात या नऊ योद्ध्यांंची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकजण शिफ्टप्रमाणे ड्युटीवर येतो. रुग्णांची गर्दी अचानक वाढली तर अतिदक्षता सेवा म्हणून या सर्वांना तातडीने एकाच वेळी हास्पिटलमध्ये पाचारण करण्यात येते अन् ते हजर होऊन सेवा देतात. डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांच्या खांद्याला खांदा लावून हे ९ सफाई कामगार सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे अविरत सेवा देत आहेत.

मुले रुग्णालयात अन् सफाई कामगार ड्युटीवरमनोज पवार, पिंटू पचेरवाल या दोघांची मुले चार दिवसांआधी आजारी पडली. बालरोग तज्ज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दोघांचे कुटुंबीय त्यांची काळजी घेत आहे. त्या मुलांचे वडील म्हणजे मनोज आणि पिंटू दोघेही कोरोना रुग्णाच्या वॉर्डात सेवा देत आहेत, अशी माहितीदेखील या सदस्यांनी दिली.कोरोना वाडॉची साफसफाई करीत असताना स्वत:ची घ्यावयाची काळजी आणि रुग्णांपासून ठेवले जाणारे सुरक्षित अंतर याचा अंतर्भाव तज्ज्ञांनी आधीच प्रशिक्षणातून दिले असले तरी आमची नियमित आरोग्य तपासणी होते. सोबतच ज्या निवासस्थानी आम्ही सध्या राहत आहोत, तेथेदेखील एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवूनच असतो. सध्या आम्ही जीएमसीच्या नोकरीपेक्षा मिशन म्हणून या सेवेकडे पाहत आहोत.- नरेंद्र गोडाले, सुपरवायजर, सफाई कामगार, जीएमसी अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय