शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सिंधी कॅम्पमध्ये सर्वेक्षण; मनपाचे शिक्षक, आशा वर्कर सरसावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 10:17 IST

कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील दक्षिण झोन अंतर्गत येणाऱ्या सिंधी कॅम्प परिसरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. या भागातील सर्वेक्षणाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला.सर्वेक्षणासाठी मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागातील साहाय्यक कर अधीक्षक, करवसुली लिपिक, शिक्षक तसेच आशा वर्कर कामाला लागले आहेत. कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण मनपा क्षेत्रात ७ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर ही संख्या वाढून ८ झाली होती. यापैकी प्रभाग क्रमांक ११ मधील ताजनापेठ भागातील एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. यादरम्यान मध्यंतरी कोरोनाचा कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण न आढळून आल्याने महापालिका तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान २६ एप्रिल रोजी दक्षिण झोन अंतर्गत येणाºया सिंधी कॅम्प परिसरातील पक्की खोली भागात राहणाºया एका ४१ वर्षीय किराणा व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. संबंधित इसमाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर येताच मनपा प्रशासनाने २६ एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाच्या मदतीने सिंधी कॅम्प परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून हा भाग सील केला. तसेच या भागात सर्वेक्षण करण्यासाठी २० पथकांचे गठन केले.६० जणांची चमू लागली कामालासिंधी कॅम्प भागातील पक्की खोली परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने या संपूर्ण प्रतिबंधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी ६० जणांची चमू कामाला लावली आहे. यामध्ये मालमत्ता कर वसुली विभागातील वसुली लिपिक, शिक्षक तसेच आशा वर्कर यांचा समावेश आहे. मंगळवारपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करा! प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सिंधी कॅम्प परिसराचे सर्वेक्षण करण्यासाठी मनपा आयुक्तांनी गठित केलेल्या पथकांना मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. या दरम्यान नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, कोणी बाहेरगावी आहे का, घरातील व्यक्तीस किरकोळ आजार आहे का, या सर्व बाबींची नोंद घेतल्या जाणार आहे.

परिसरात केली फवारणी सिंधी कॅम्प भागातील पक्की खोली परिसरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित इसमाच्या घरी तसेच घरालगतच्या रहिवाशांच्या घरी महापालिकेच्या मलेरिया विभागाच्यावतीने निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच परिसरातही फवारणी करण्यात आली.

कोरोनाबाधित रुग्णाचे घर व घरालगतच्या संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आला. तसे स्पष्ट निर्देश मलेरिया विभागाला दिले होते. वैद्यकीय आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा कोणतीही हयगय खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.- संजय कापडणीस,आयुक्त, मनपा

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका