शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘कोरोना’बाधितांची आता एकच चाचणी; दहाव्या दिवशी सुटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:12 IST

पहिल्या चाचणीनंतर तो ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यावर दहा दिवस उपचार केले जाणार आहेत.

अकोला : कोरोनाबाधित रुग्णाच्या सलग तीन चाचण्या ‘निगेटिव्ह’ आल्यानंतरच त्याला सुटी दिली जात होती; मात्र ‘आयसीएमआर’च्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार रुग्णाची कुठलीही चाचणी न करता थेट दहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे. सुटी देण्यात आलेल्या रुग्णाला आता १४ ऐवजी सात दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’ राहावे लागणार आहे.कोरोनाविषयी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाच्या संदिग्ध रुग्णाच्या पहिल्या चाचणीनंतर तो ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यावर दहा दिवस उपचार केले जाणार आहेत. यानंतर त्याची पुन्हा चाचणी केली जाणार नाही. दरम्यान, मध्यम लक्षणे असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना दहाव्या दिवशीच चाचणीशिवाय सुटी दिली जाणार आहे; परंतु सुटी देत असताना रुग्णाला सलग तीन दिवस ताप नसावा किंवा आॅक्सिजनची गरज भासू नये, अशी अटही ठेवण्यात आली आहे. रुग्णाला सुटी दिल्यानंतर आता १४ दिवसांऐवजी केवळ सात दिवसांसाठीच त्यांना ‘होम क्वारंटीन’ राहावे लागणार आहे.अशा आहेत मार्गदर्शक सूचना सौम्य लक्षणे असणाºया रुग्णांसाठी‘आयसोलेशन’ कक्षात दाखल करण्यात आलेल्या सौम्य किंवा प्रारंभिक लक्षणे असलेल्या रुग्णांचे नियमित तापमान तपासले जाणार आहे.पल्स मॉनिटरिंगही केले जाईल.त्यांना सलग तीन दिवस ताप नसेल आणि उपचाराचे दहा दिवस पूर्ण झाले असेल, तर रुग्णांना सुटी देण्यात येईल.सुटीनंतर १४ ऐवजी सात दिवस ‘होम क्वारंटीन’ राहावे लागणार.कोरोनाबाधिताला सुटी देण्यापूर्वीकोरोनाबाधित रुग्णाला ‘कोविड केअर फॅसिलिटी सेंटर’मधून सुटी देण्यापूर्वी रुग्णाचे ‘आॅक्सिजन सॅच्युरेशन’ ९५ टक्यांपेक्षा खाली आले, तर त्याला ‘डेडिकेटेड कोविड केअर’मध्ये दाखल करण्यात येईल. डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णाला पुन्हा ताप, कफ किंवा श्वास घेण्यास समस्या निर्माण झाल्यास त्यांना ‘कोविड केअर फॅसिलिटी’, राज्याचा मदत क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.

...तर त्या रुग्णांवर आणखी तीन दिवस उपचारज्यांना आॅक्सिजन दिला आहे आणि तीन दिवसांनंतरही ताप आहे, अशा रुग्णांना कोरोनाचे कोणतेही लक्षण नसेल, तरच सुटी दिली जाणार आहे. तसेच सलग तीन दिवस आॅक्सिजन सॅच्युरेशन कायम राहिल्यानंतरच त्यांना सुटी दिली जाईल.अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यावरच गंभीर रुग्णांना सुटीगंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे पूर्णत: गेल्याशिवाय त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाणार नाही. तसेच लक्षणे पूर्णत: नाहीशी झाल्यानंतरच त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्यांना सुटी दिली जाणार आहे.‘आयसीएमआर’च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांना दहाव्या दिवशी सुटी दिली जाईल; परंतु गंभीर रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय त्याला सुटी दिली जाणार नाही. रुग्णांना सुटी दिल्यानंतरही सात दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’ राहावे लागणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या