शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘रॅपिड टेस्टिंग’ला अकोला जिल्ह्यात प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:18 IST

रविवारी पातूर तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमध्ये कोरोनाच्या रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात झपाट्याने होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता चाचण्यांचा वेगही वाढविला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याला ५०० हजार ‘रॅपिड टेस्ट किट’ उपलब्ध झाल्या असून, आणखी दोन हजार किट मिळणार आहे. जिल्ह्याला प्रत्यक्षात आणखी १० हजार किटची प्रतीक्षा आहे. उपलब्ध किटच्या माध्यमातून रविवारी पातूर तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमध्ये कोरोनाच्या रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली.सध्या कोविड रुग्णांच्या चाचणीसाठी अचूकता व एकाच वेळी चार ते पाच तासांच्या कालावधीत ९० नमुने तपासणीची क्षमता असणाऱ्या ‘रिअल टाइम- आरटीपीसीआर’ या प्रणालीचा उपयोग केला जातो. ही चाचणी उत्तम असली, तरी वाढत्या रुग्णसंख्येचा वेग पाहता आणखी जलद गतीने तपासण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन बेस्ड’ तत्त्वावर आधारित चाचणी प्रणालीला मान्यता दिल्याने आता थेट कंटेनमेन्ट झोनमध्येच संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्याला २,५०० ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन बेस्ड’ किट उपलब्ध झाल्या असून, त्या माध्यमातून पातूर तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमधून रॅपिड टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात अकोला शहरासह जिल्ह्यातील इतरही तालुक्यात ‘रॅपिड टेस्ट’ किटच्या साहाय्याने कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

किट मिळण्यास होत आहे विलंब‘रॅपिड टेस्ट किट’ मिळण्यास विलंब होत असल्याने कंटेनमेन्ट झोनमधील हायरिस्क रुग्णांची तपासणी उशिरा होत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आणखी वेगाने होत आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतर्फे १० हजारपेक्षा जास्त रॅपिड टेस्ट किटची मागणी केली होती; परंतु त्यापैकी केवळ ५०० किट उपलब्ध झाल्या आहेत.

पातुरात ११ जण पॉझिटिव्ह!पातूर : रॅपिड अँटीजन टेस्टचा वापर सर्वप्रथम पातूर येथील स्वॅब कलेक्शन सेंटर वर करण्यात आला.याठिकाणी २२१ जणांचे नमुने तपासल्यानंतर त्यातील ११ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांनी दिली.रविवारी नागरिकांनी घशातील स्रावाचे नमुने दिले. रॅपिड टेस्ट पद्धतीमुळे पातुरात नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतल्यानंतर पहिल्या अर्धा तासातच सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले. संध्याकाळपर्यंत ही संख्या ११ वर गेली आहे. उर्दू शाळा क्रमांक एक आणि मराठी शाळा क्रमांक १ या दोन ठिकाणी नमुने संकलनाचे केंद्र उभारण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी दिली. दरम्यान, पातुरात मंगळवारी लक्ष्मीबाई देशपांडे शाळा आणि न.प. शाळा क्रमांक २ याठिकाणी रॅपिड टेस्ट शिबिर आयोजित केले आहे.

अशी होते ‘रॅपिड टेस्ट’या चाचणीत संदिग्ध व्यक्तीच्या नाकाच्या आतील स्त्राव घेतला जातो. हा स्त्राव व्हिटीएम (श््र१ं’ ळ१ंल्ल२ाी१ टी्िरं) द्रावणात मिसळला जातो. या द्रावणाचे किटच्या टेस्ट पट्टीच्या एका टोकाला टाकला जातो. या पट्टीच्या दुसºया टोकाला एक बारीक गुलाबी रेघ असते. सुमारे २५ ते ३० मिनिटात स्त्राव मिश्रीत द्रावण हे पट्टीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचते. तर तेथे आणखी एक गुलाबी रेघ तयार झाली तर स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आहे, असे समजले जाते, असे डॉ.चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्याला ५०० रॅपिड टेस्ट किट उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार पातूर येथील कंटेनमेन्ट झोनमधून तपासणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यामुळे कोरोना चाचणीचा वेग वाढविण्यास मदत होईलच, शिवाय रुग्णांच्या वाढत्या संख्येवर अंकुश लावण्यासही मदत होईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याPaturपातूर