शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : रामदासपेठ ठाण्याचे १० पोलीस ‘होम क्वारंटीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:48 IST

रामदासपेठ पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ निघाला आहे.

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना कोरोना ‘पॉझिटिव्ह’ची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल केले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांसह ठाण्यातील दहा पोलिसांनाही ‘होम क्वारंटीन’च्या सूचना दिल्या असून, त्यांना रजेवर पाठविण्यात आले आहे. शहरात कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ असलेला बैदपुरा परिसर हा रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. सर्वाधिक कोरोना रुग्ण याच परिसरातून असून, कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात याच परिसरातील आहेत. त्यामुळे या परिसराची संपूर्ण जबाबदारी असलेल्या रामदासपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस संपर्कात आले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून रामदासपेठ पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ निघाला आहे. पोलीस पॉझिटिव्ह निघाल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना सुरक्षेच्या नव्या दृष्टीने सुविधाही पुरविण्यात येत आहेत. तसेच रामदासपेठ पोलीस ठाणेही सॅनिटाइझ करण्यात आले. पोलिसांची टेस्ट करून तणाव कमी करण्याची गरज!कोरोना फायटर्समध्ये पोलीस हा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याला रुग्णालयात पोहोचविण्याचीही जबाबदारी पोलिसांवर येऊन ठेपली आहे. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये पोलिसांचा खडा पहारा आहे. त्यामुळे येणारे-जाणारे सहजच पोलिसांच्या संपर्कात येतात. त्यामुळे पोलिसांची कोरोना टेस्ट करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ड्युटीचे तासही अधिक असल्याने त्यांना आरामाची गरज आहे. म्हणून पोलीस तणावमुक्त कसे राहतील, याचाही विचार करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनAkolaअकोला