शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : पालकमंत्र्यांवर नागरिकांकडून सूचनांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 10:20 IST

पालकमंत्री बच्चू कडू व विविध सामाजिक संस्था व नागरिकांदरम्यान मंगळवारी पार पडलेल्या मुक्त चर्चेत पालकमंत्र्यांना नागरिकांकडून सूचनांचा अक्षरश: पाऊस पडला.

ठळक मुद्दे‘कोरोना : उपाय व समस्या’ या विषयावर मुक्त चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.डॉ. नीलेश पाटील यांनी तयार केलेला ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ पालकमंत्र्यांना सादर केला.नागरिकांनी विविध सूचना लेखी स्वरूपात पालकमंत्र्यांकडे सादर केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासंदर्भात तसेच नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू व विविध सामाजिक संस्था व नागरिकांदरम्यान मंगळवारी पार पडलेल्या मुक्त चर्चेत पालकमंत्र्यांना नागरिकांकडून सूचनांचा अक्षरश: पाऊस पडला. पालकमंत्री बच्चू कडू यांनीही प्रशासनासह सर्वांचीच चूक झाल्याचे कबूल करत नागरिकांच्या सूचनांची दखल घेण्याची ग्वाही दिली.स्थानिक नेहरू पार्कच्या हिरवळीवर मंगळवारी ‘कोरोना : उपाय व समस्या’ या विषयावर मुक्त चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर पालकमंत्री बच्चू कडू, आमदार अमोल मिटकरी, डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ समाजसेवक महादेवराव भुईभार, बी. एस. देशमुख व राजाभाऊ देशमुख उपस्थित होते. यावेळी युवा राष्ट्र संघटनेकडून डॉ. नीलेश पाटील यांनी तयार केलेला उपाययोजनांसदर्भातील ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ पालकमंत्र्यांना सादर केला. चर्चेला उपस्थित नागरिकांनी विविध सूचना लेखी स्वरूपात पालकमंत्र्यांकडे सादर केल्या. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारींचा पाढाच नागरिकांनी सूचनांमधून मांडला. सर्वोपचार रुग्णालय, कोविड केअर सेंटरमधील असुविधांकडे लक्ष वेधले. रोजगाराबाबत आॅनलाइन मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक संघटना तयार असल्याचे डॉ. गजानन नारे यांनी सांगितले.समन्वयासाठी लोकसहभाग सेल स्थापन करण्याची सूचना गणेश बोरकर यांनी केली. शहरातील भाजीपाला व्यावसायिकांसाठी वर्धा पॅटर्नप्रमाणे व्यवस्था करावी, असे मत सुधीर रांदड यांनी व्यक्त केले.गरजूंसाठी धान्य बँकेची कल्पनाही यावेळी मांडण्यात आली. प्रशांत गावंडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. तर धनंजय मिश्रा यांनी संचालन केले. दरम्यान, या बैठकीत स्वयंसेवी संस्थांनाकडून प्रतिबंधित क्षेत्र दत्तक घेण्याबाबत सकारात्मक पुढाकार दाखविण्यात आला.आता ‘बच्चू कडू स्टाइल’ हवी - हुसेनकोरोनाबाधितांच्या आजवरच्या अनुभवांवरून लोकांचा सर्वोपचार रुग्णालयांवरील विश्वास उडाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने खासगी रुग्णालयांकडून पूर्णपणे सेवा घेणे गरजेचे आहे, असे मत नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी व्यक्त केले. अकोलेकरांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पुन्हा आपली बच्चू कडू स्टाइल अंगीकारा, अशी विनंतीही झिशान हुसेन यांनी केली.ही वेळ चुका काढण्याची नव्हे - पालकमंत्रीकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जनजागृतीही मोठ्या प्रमाणात होत आहे; परंतु लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. तसेच प्रशासनाकडूनही काही चुका निश्चित झाल्या. चुका सर्वांकडूनच झाल्या; पण ही वेळ चुका काढण्याची नाही, असे यावेळी पालकमंत्री म्हणाले. ३५ लाख लोकसंख्येच्या नागपुरात साडेपाच हजार चाचण्या झाल्या, तर ५ लाख लोकसंख्येच्या अकोल्यात ७ हजारावर चाचण्या झाल्या. त्यामुळे अकोल्यात रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे, असे सांगत सर्वांचे सहकार्य राहिले तर लवकरच अकोला कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याBacchu Kaduबच्चू कडू