शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : रुग्ण ‘कोरोना’मुक्त होताहेत; पण धोक्याची घंटा कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 10:03 IST

सात दिवसांचे ‘होम क्वारंटीन’ योग्यरीत्या पाळले नाही, तर अकोलेकरांसाठी हा प्रकार धोकादायक ठरू शकतो.

अकोला : ‘आयसीएमआर’च्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार ‘पॉझिटिव्ह’ आढळलेल्या रुग्णावर उपचार करून त्याला दहाव्या दिवशी कोरोनामुक्त घोषित करून त्यांना सुटी दिली जात आहे. त्यामुळेच गत काही दिवसांत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दिसून येत आहे; परंतु सुटी दिल्यानंतर डॉक्टरांच्या सूचनेनुसार रुग्णांनी सात दिवसांचे ‘होम क्वारंटीन’ योग्यरीत्या पाळले नाही, तर अकोलेकरांसाठी हा प्रकार धोकादायक ठरू शकतो.जिल्ह्यात विशेषत: शहरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून, रुग्णसंख्या २१८ पर पोहोचली आहे. शिवाय, कोरोनामुळे मृतकांचीही संख्या वाढत असून, हा आकडा १७ वर पोहोचला आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा संपूर्ण भार सर्वोपचार रुग्णालयावर पडत होता. दरम्यान ‘आयसीएमआर’तर्फे कोरोनासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. त्यानुसार, पहिल्या चाचणीत रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्यावर रुग्णालयात पूर्ण उपचार केला जाईल; परंतु त्याला दहाव्या दिवशी कुठलीही चाचणी न करता सोडण्याचेही निर्देश दिले आहेत. असे असले तरी गंभीर रुग्णांच्या बाबतीत वेगळी नियमावली आहे. रुग्णालयातून सुटी झालेल्या अशा रुग्णांना १४ दिवसांऐवजी सात दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’च्या सूचना डॉक्टरांकडून दिल्या जातात; मात्र संबंधित रुग्णांनी ‘होम क्वारंटीन’ योग्यरीत्या न पाळल्यास कोरोनाचे विषाणू एकापासून दुसºयापर्यंत पोहोचण्याचा धोका आहे. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.‘होम क्वारंटीन’चे उल्लंघननवीन नियमानुसार, उपचारानंतर दहाव्या दिवशी कोरोनाच्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी दिली जाते. सोबतच सात दिवसांचे ‘होम क्वारंटीन’ पाळण्याबाबत सूचनाही दिली जाते; परंतु अनेकजण रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर ‘होम क्वारंटीन’च्या नियमांना तिलांजली देत सर्वांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वास्तव आहे. काहींच्या निवास्थानामध्ये स्वतंत्र राहणे शक्य नसल्याने त्यांच्याकडून ‘होम क्वारंटीन’चे नियम पाळणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत कोरोनाचे विषाणू एकापासून दुसºयापर्यंत सहज पसरू शकतात.हे आवश्यक...

  • सुटी झाल्यानंतर रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
  • त्यासाठी रुग्णांनी इतरांपासून दुरावा ठेवणे आवश्यक आहे.
  • मास्कचा उपयोग करणे.
  • वारंवार हात धुणे.
  • घरात कुठल्याही वस्तूला स्पर्श न करणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या