शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

CoronaVirus : चार महिन्यात २५ हजारांवर चाचण्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 10:36 AM

१२ एप्रिलपासून चाचण्यांना सुरुवात झाली असून, आतापर्यंत तब्बल २५ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देतीन हजार अहवाल पॉझिटिव्ह आले.यामध्ये अकोलासह बुलडाणा, वाशिम या जिल्ह्याचाही समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयांमध्ये व्हीआरडीएल लॅब सुरू होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी झाला आहे. जवळपास २५ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील तीन हजार अहवाल पॉझिटिव्ह आले असून, २३३२ अहवाल अकोला जिल्ह्यातील आहेत.आयसीएमआरच्या परवानगीनुसार, १२ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील व्हीआरडीएल लॅब सुरू करण्यात आली. इतर लॅबच्या तुलनेत अकोल्यातील लॅबला मनुष्यबळही कमीच मिळाले. या आधारावर अकोल्यातील आणि आरडीएल लॅबमध्ये कोरोनाच्या चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली. कोरोनाचा जिल्ह्यात झपाट्याने प्रसार होत असताना वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातीलही नमुने चाचणीसाठी अकोल्यात येऊ लागले. अशा परिस्थितीतही रात्रंदिवस काम करत व्हीआरडीएलमधील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या यशस्वी चाचण्या केल्यात. १२ एप्रिलपासून चाचण्यांना सुरुवात झाली असून, आतापर्यंत तब्बल २५ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोलासह बुलडाणा, वाशिम या जिल्ह्याचाही समावेश आहे.मध्यंतरी अमरावती, यवतमाळ आणि जळगाव येथीलही नमुने चाचण्यांसाठी अकोला व्हीआरडीएलमध्ये तपासण्यात आलेत; मात्र यावरील वाढता ताण पाहता, अमरावती यवतमाळ आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली; मात्र तरीदेखील जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला, त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात रात्रंदिवस नमुन्यांची तपासणी केली.

एकही दिवस घेतली नाही सुट्टी!अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबमध्ये आठ तंत्रज्ञ आणि चार विशेषज्ञ काम करत आहेत. अकोलासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढवावे लागले. त्यामुळे लॅबमधील कर्मचाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी न घेता रात्रंदिवस चाचण्या केल्यात. राज्यातील इतर लॅबच्या तुलनेत अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबमध्ये मनुष्यबळ कमी आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

रॅपिड अ‍ॅन्टिजनमुळे वाढला चाचण्यांचा वेग!जिल्ह्यात जवळपास महिनाभरापासून रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाचण्यांचा वेग वाढला आहे. परिणामी पॉझिटिव्ह रुग्णांचेही वेळेत निदान होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७८४८ चाचण्या झाल्या असून, त्यापैकी ३७५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या