शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अकोल्यात कोरोनाबधितांचा आकडा दोनशेपार; दिवसभरात २१ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:48 IST

दिवसभरात २१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २०७ झाली आहे.

ठळक मुद्देसकाळी ११, तर सायंकाळी १० असे २१ नव्हे पॉझिटिव्ह.गुरुवारी १२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सद्यस्थितीत १२० रूग्ण रुग्णालयात दाखल.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रकोप वाढतच असून गुरुवार १४ मे रोजी तब्बल २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०७ सातवर पोहोचली असून, अकोलेकरांची चिंता वाढली आहे. मात्र, याच सोबत उपचारामुळे पूर्ण बरे झालेल्या १२ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ेरेड झोनमध्ये आल्यानंतर अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, गुरुवार १४ मे रोजी रुग्णांची संख्या २०७ वर पोहोचली. गत काही दिवसात अकोला शहरातील बहुतांश भाग कंटेन्टमेंट झोनमध्ये रुपांतरीत झाले असून, ही कोलेकरांसाठी धोक्याची घंटा आहे. गुरुवारी एकाच दिवशी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी प्राप्त ७४ अहवालांपैकी ११ अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये दोन रुग्ण खैर मोहम्मद प्लॉट, दोन माळीपूरा येथील, तर फिरदोस कॉलनी, आंबेडकर नगर शासकीय गोदाम खदान, गोकुळ कॉलनी, तारफैल, खडकी, पोलीस क्वार्टर येथील रहिवासी आहेत. यामध्ये नऊ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये आणखी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये तीन जण आंबेडकर नगर, तर अन्य माळीपूरा, फिरदोस कॉलनी, खदान, सिटी कोतवाली, सिव्हिल लाईन्स, मोमीनपुरा, नेहरू नगर येथील रहिवासी आहेत. यामध्ये सात पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एकाने आत्महत्या केली आहे. तर गुरुवारी १२ जणांना कोरोनामुक्त करून रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने आज रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात एकूण १२० रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ९८ अहवाल निगेटिव्ह कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या प्रलंबित अहवालापैकी ११९ अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. त्यापैकी २१ अहवाल पॉझिटिव्ह , तर ९८ अहवाल निगेटिव्ह आले. अशी आहे स्थिती एकूण कोरोनाबाधित रुग्ण - २०७ अ‍ॅक्टिव्ह रूग्ण - १२० मृत्यू झालेले रुग्ण - १५ (एकाची आत्महत्या) कोरोनामुक्त - ७२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला