शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आता पॉझिटिव्ह रुग्णांना आणण्याची जबाबदारी 'जीएमसी'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:24 IST

शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाºया रुग्णांना आणण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनावर निश्चित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करणे तसेच त्यांच्या निकटवर्तीयांचा शोध घेण्याची महापालिकेला करावी लागणारी कसरत आता थांबणार असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाºया रुग्णांना आणण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनावर निश्चित केली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाºया रुग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची असताना महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन आजपर्यंत ही सर्व प्रक्रिया इमानेइतबारे पार पडल्याचे दिसून आले आहे. परंतु रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता महापालिकेला कंटेनमेंट झोन वाढवावे लागत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. महापालिकेची होत असलेली दमछाक लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी शहरातील कोरोना पॉझिटिव रुग्णांना आणण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयकडे सोपवली आहे. यासोबतच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे तसेच भूमिअभिलेख विभागातील उपअधीक्षक योगेश कुलकर्णी यांच्यावर रुग्णांना आणून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे.मनपाचे 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'वर लक्षरुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच मनपाची यंत्रणा कामाला लागत होती. संबंधित भागाचे सर्वेक्षण करून नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी मनपाचे शिक्षक आशा वर्कर यांची नियुक्ती केली जात आहे. यामध्ये कोरोना बाधित रुग्णाचे निकटवर्तीय तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मनपाची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुधारित आदेशामुळे मनपाला काही अंशी दिलासा मिळाला असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर मनपा लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती आहे.

सिंधी कॅम्प वासियांना दिलासा

सिंधी कॅम्प मधील पक्की खोली भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. ही बाब लक्षात घेता भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलीमचंदानी यांनी पुढाकार घेत सिंधी कॅम्प भागात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 83 जणांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येऊन काही संशयित रुग्णांचे नमुने सामान्य रुग्णालय कडे पाठविले असता या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सिंधी कॅम्पवासियांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या