शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अकोला तालुक्यात प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 10:31 IST

अकोला शहरासह तालुका परिसरात क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन लागू केला जात आहे.

अकोला : शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने अकोला शहरासह तालुका परिसरात क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन लागू केला जात आहे. त्यानुसार तालुक्याच्या सीमांवर प्रवेशबंदी करणे तसेच शहरातील वाहतुकीवरही निर्बंध लावण्यासोबतच नागरिकांना सकाळ, संध्याकाळी मॉर्निंग वॉक करण्याला बंदी केल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी रविवारी रात्री दिला आहे.अकोला उपविभागात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळत आहेत. तसेच रविवारी शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांनी मनाई हुकूम आदेश दिला आहे. त्यानुसार २६ एप्रिलपासून ते पुढील आदेशापर्यंत तो लागू राहणार आहे. त्या आदेशात अकोला तालुक्याच्या सीमा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तालुक्यात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. क्लस्टर कंटेनमेंटसाठी हा अ‍ॅक्शन प्लॅन पोलिसांनी राबवावा, असेही आदेशात म्हटले आहे.त्यासाठी अकोला शहरात येणाºया सर्व रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामध्ये डाबकी रेल्वे गेट, बाळापूर नाका, शिवर बायपास, वाशिम बायपास, पाचमोरी अकोट रोड, आपातापा रोड, दमाणी हॉस्पिटल, गुडधी रेल्वे गेट, खरप रेल्वे गेट, खडकी बायपास, मलकापूर एमआयडीसी रेल्वे गेट, महाबीज प्रक्रिया केंद्र शिवणी, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नायगाव रोड येथून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सोबतच अकोला शहरातील विविध भागातही दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आला आहे.

जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याला सूटया आदेशातून जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. सोबतच या क्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांनी दुकानदारांनी दुकानातूनच वाटप करावे, क्षेत्राबाहेरच्या लाभार्थींना छोट्या वाहनांतून घरपोच धान्य द्यावे, असेही बजावण्यात आले आहे.फिरायला जाण्यावरही बंदीविशेष म्हणजे, अकोला शहरात सकाळी व सायंकाळी फिरणाºया व्यक्तींनाही या आदेशाने बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन महापालिका व पोलीस विभागाकडून केले जाणार आहे. त्याबाबतचा दैनंदिन अहवालही मागवण्यात आला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या