शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘जीएमसी’मध्ये आजपासून १२० खाटांचा नवीन ‘वॉर्ड ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 09:49 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएसी) कोरोना रुग्णांसाठी १२० खाटांचा नवीन वॉर्ड शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

अकोला : अकोला शहरात दररोज वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब असल्याचे सांगत, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएसी) कोरोना रुग्णांसाठी १२० खाटांचा नवीन वॉर्ड शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘जीएमसी’मध्ये नवीन सुरू करण्यात येणाऱ्या १२० खाटांच्या वॉर्डमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना भरती करणे व त्यांच्यावर उपचार करण्याचे काम करण्यात येणार आहे. अकोला शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजनांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक संबंधित क्षेत्रातून बाहेर येणार नाहीत, यासाठी त्या क्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांना घरपोच अन्नधान्य पोहोचविणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वैद्यकीय सेवा आदी प्रकारच्या सुविधा त्याच भागात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘अ‍ॅक्शन प्लॅन’मधील विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनामार्फत तातडीने करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण उपस्थित होते.प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी तपासणी; रात्रीच्या वेळी फिरते रुग्णालय!अकोला शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, त्यामध्ये प्रत्येक घरातील सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या एकत्रित तपासणीनंतर रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात रेडक्रॉस दवाखाना आणि रात्रीच्यावेळी फिरते रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.