शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'मध्ये आली शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 10:43 IST

वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कडेही कानाडोळा होण्याचे प्रमाण वाढले असून, संपर्कातील नागरिकांनी स्वॅब दिले की नाही, याची पडताळणी करण्यात दिरंगाई होत आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढताच आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सात दिवसाच रुग्णांची संख्या ५७६ च्या वर गेली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असताना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेताना यंत्रणांची दमछाक होत आहे. दुसरीकडे वाढत्या रुग्णसंख्येमुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कडेही कानाडोळा होण्याचे प्रमाण वाढले असून, संपर्कातील नागरिकांनी स्वॅब दिले की नाही, याची पडताळणी करण्यात दिरंगाई होत आहे.सध्या जिल्हाभरात रॅपिड अ‍ॅन्टिजन, ट्रुनेट व आरटी-पीसीआरद्वारे चाचण्या होत आहे. रुग्णांची वाढती संख्या तसेच मृत्यूची संख्या लक्षात घेता चाचण्यांचा वेगही वाढविण्यात आला आहे; मात्र आरोग्य यंत्रणाचे सध्याचे नियोजन मात्र अपुरे पडत आहे. त्याला अपुरे मनुष्यबळ व आरोग्य यंत्रणेवर दोन महिन्यात वाढलेला ताण याचाही फटका ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ला होत आहे.ज्या भागात रुग्णांची नोंद झाली त्या भागातील आरोग्य केंद्राद्वारे त्वरित उपाययोजना होणे, हायरिस्क रुग्णांशी संवाद साधून त्यांना स्वॅब देण्यासाठी पाठविणे, प्रसंगी केंद्रावर घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात या संदर्भात तत्परता होती; मात्र आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही तत्परता कमी झाल्याचे दिसत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविल्यास संक्रमणावर नियंत्रण येऊ शकेल. त्यामुळे या प्रक्रियेचा नव्याने आढावा घेण्याची गरज आहे.बॉक्स...संपर्कातील व्यक्तींचाही टेस्ट टाळण्यावर भरकोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करावी असे बंधन आहे. खासगी कार्यालये, प्रतिष्ठानांमधील अनेकांनी मात्र या टेस्टला बगल दिली. अशा व्यक्ती कोरोनाचा प्रसार करू शकतात. असे अनेक ‘कोरोना बॉम्ब’ शहरात, जिल्ह्यात फिरत आहेत. टेस्ट केली की हमखास पॉझिटिव्ह येते, असा गैरसमज काही जण जाणीवपूर्वक पसरवत असल्याने सौम्य लक्षणे असणाऱ्या अनेकांनी टेस्ट टाळण्यावरच भर दिल्याची माहिती आहे. गृह विलगीकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण असिम्टोमॅटिक असल्याने ते बाहेर पडल्यास कोरोनाचा प्रसार थांबणार नाही.बॉक्स...होम क्वारंटीन रुग्णांबाबत हवी अधिक काळजीजिल्ह्यातील ३५ च्या वर रुग्णांनी होम क्वारंटीनची सुविधा घेतली आहे. या रुग्णांना १८ दिवस वेगळ्या खोलीत राहावे लागते. या रुग्णाच्या घराला याविषयीचे बोर्ड लावावे, यासह अन्य महत्त्वाचे निर्देश आहेत; मात्र अशा संक्रमित व्यक्तींच्या घराला बोर्ड लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या रुग्णांविषयी परिसरातील नागरिक अनभिज्ञ आहेत.ल्ल कोट....ल्ल कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात मनपा तसेच आरोग्य विभागाचे पथक दक्ष आहे; मात्र रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनीही स्वत:सह परिवार व समाजाच्या हितासाठी टेस्टसाठी पुढे येणे आवश्यक आहे, तरच कोरोनाच्या संक्रमणावर अधिक वेगाने नियंत्रण शक्य होईल.ल्ल - संजय कापडणीस, मनपा आयुक्त

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका