शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मनपाच्या आरोग्य निरीक्षकांचा शहरातील खासगी रुग्णालयांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 10:49 IST

रुग्णांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत.

अकोला: महापालिका क्षेत्रात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने शहरातील प्रत्येक खासगी रुग्णालये, क्लिनिक यांना भेटी देऊन त्या ठिकाणी येणाºया रुग्णांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत. त्या पृष्ठभूमीवर आरोग्य निरीक्षकांकडून खासगी रुग्णालयांवर ‘वॉच’ ठेवल्या जात असून, यासंदर्भातील दैनंदिन अहवाल क्षेत्रीय अधिकाº­यांकडे सादर केला जात असल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरात ७ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर ८ एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक दोनमधील अकोट फैल भागात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला. आज रोजी प्रभाग क्रमांक ११ मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या सात झाली आहे. शहराच्या उत्तर झोनमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी उत्तर झोनमधील दोन्ही प्रभागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात होणार नाही, याबद्दल मनपा प्रशासनाच्या स्तरावर दक्षता घेतली जात आहे. याच उद्देशातून महापालिकेने शहरातील एकूण वीस प्रभागांमध्ये ठिकठिकाणी असलेल्या खासगी हॉस्पिटल तसेच क्लिनिकमध्ये आरोग्य तपासणीसाठी येणाºया रुग्णांची नोंद घेण्याचे निर्देश स्वच्छता व आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत. या कामासाठी आरोग्य निरीक्षकांना वेळोवेळी दिशानिर्देश दिल्या जात आहेत.

रुग्णांची दैनंदिन नोंद ठेवावीच लागेल!संपूर्ण शहरात लहान-मोठी अनेक खासगी रुग्णालये तसेच क्लिनिक आहेत. रुग्णसेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यामुळे हॉस्पिटल सुरू ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या सर्व रुग्णांची नोंद संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.रुग्णांच्या संख्येत घटसंसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून ३ मेपर्यंत लागू केली. दुसरीकडे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी कायम ठेवली आहे. यामुळे याचा परिणाम शहरातील रुग्णालयांवर झाल्याचे दिसून येत आहे. मनपातील आरोग्य निरीक्षकांच्या तपासणीत शहरातील हॉस्पिटलमधील रुग्ण संख्येत घसरण आल्याचे समोर आले आहे.दैनंदिन अहवाल क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे!महापालिका क्षेत्रात एकूण २० प्रभाग आहेत. यामध्ये सर्वाधिक खासगी हॉस्पिटलची संख्या पूर्व व दक्षिण झोनमध्ये आहे. यासह पश्चिम व उत्तर झोनमध्येही लहान-मोठी रुग्णालये व क्लिनिक आहेत. या संपूर्ण रुग्णालयांना दररोज भेटी देऊन तेथील रुग्ण व त्यांच्या आजाराची माहिती घेऊन ती आरोग्य निरीक्षकांकडून संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांकडे सादर केली जात आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या