शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : शिशूच्या जन्मानंतर आईचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’; नवजात शिशूचेही नमुने घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 09:57 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका मातेचे वैद्यकीय चाचणी अहवाल बुधवारी रात्री ‘पॉझिटिव्ह’ आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच एका गर्भवतीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली आहे. प्रसूतीनंतर या महिलेचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले असून, पाच दिवसांनंतर नवजात शिशूचेही नमुने चाचणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.गत आठवड्यापासून शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका मातेचे वैद्यकीय चाचणी अहवाल बुधवारी रात्री ‘पॉझिटिव्ह’ आल्याने एकच खळबळ उडाली आहे.ही गर्भवती अकोट फैल परिसरातील रहिवासी असून, बुधवारी दुपारीच तिची प्रसूती झाली होती. रात्री अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर त्या मातेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. नवजात शिशूला ‘एसएनसीयू’मध्ये ठेवण्यात आले असून, पाच दिवसांनंतर त्या बाळाचे ‘स्वॅब’ घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. अकोला जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे अकोलेकरांची चिंता वाढली असून, त्या चिमुकल्याच्या वैद्यकीय चाचणी अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

शिशूला आईचे दूध चालते; पण...नवजात शिशू फोरमच्या मार्गदर्शक अहवालानुसार, कोरोना संदिग्ध किंवा बाधित माता असेल तरी, त्या मातेचे दूध नवजात शिशूला देता येते; परंतु शिशूला दूध देण्यापूर्वी मातेने आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करण्याची गरज आहे.

‘लेडी हार्डिंग’मध्ये विशेष खबरदारीजिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यातील गर्भवतीदेखील प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने येतात. अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय, प्रत्येक गर्भवतींचे स्क्रीनिंग केले जात आहे.यापूर्वी १२ गर्भवतींचे अहवाल ‘निगेटिव्ह’!जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतींचे नियमित स्क्रीनिंग केले जाते. या माध्यमातून आतापर्यंत १३ गर्भवतींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यातील एका गर्भवतीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’, तर १२ गर्भवतींचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.

अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे कळताच संबंधित मातेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. गर्भवतींना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा स्त्री रुग्णालयात आधीच विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शिवाय, प्रतिबंधित क्षेत्रातून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केल्याने इतरांना त्याचा धोका नाही.- डॉ. आरती कुलवाल,वैद्यकीय अधीक्षिका,जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालयAkolaअकोला