शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : राज्याच्या तुलनेत अकोल्यातील मृत्युदर जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:24 IST

येथील मृत्यूचा दर राज्याच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी जास्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, आतापर्यंत तीन हजार २८९ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे, तर अकोला जिल्ह्यात दररोज एकाचा बळी जात असून, आतापर्यंत ४३ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अकोल्यातील मृतांची संख्या कमी असली, तरी येथील मृत्यूचा दर राज्याच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी जास्त आहे.राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासाही मिळत आहे; पण यासोबतच कोरोनामुळे होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. राज्यात गुरुवार, ११ जूनपर्यंत तीन हजार २८९ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यानुसार, राज्यातील मृत्युदर हा ३.६ एवढा आहे; मात्र या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर ४.७ असा आहे.अकोला जिल्ह्याचा हा मृत्युदर राज्याच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी जास्त आहे. वास्तविक पाहता राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे; मात्र येथे दररोज एकाचा बळी जात असल्याने जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. मृत्यूचे हे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच आवश्यक पावले न उचलल्यास जिल्ह्याची परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला