शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कंचनपूर येथे आरोग्य विभागाचे घरोघरी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 18:59 IST

रविवारी सकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.

हातरुण: कंचनपुर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने गाव उरळ पोलिसांनी प्रवेशबंदी करून सील केले आहे. तसेच रविवारी सकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. यावेळी ४० संदिग्ध रुग्णांना अकोला रेफर करण्यात आले आहे. तसेच ४५ लोकांना गावात होम क्वारंटीन करण्यात आल्याची माहिती आगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयकुमार नाथक यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. गावात निजंर्तुकीकरण करण्यासाठी शनिवारी आणि रविवारी फवारणी करण्यात आली.अकोला तालुक्यात येणाऱ्या कंचनपूर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार, आगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आणि ग्रामपंचायत प्रशासनाने विविध उपाययोजना राबवित खबरदारीचा उपाय म्हणून गाव सील केले आहे. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. गावात रूग्ण आढळल्यानंतर बाहेरगावावरून येणाºया नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून कंचनपूर गावात उरळ पोलिसांचा पहारा आहे. गावातील हातावर पोट भरणाºया काही नागरिकांना सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील आणि गावातील नागरिकांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.रविवारी सकाळी कंचनपूर गावात गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या १२ पथकांनी १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात २५० घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. कंचनपूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, उरळ ठाणेदार विलास पाटील, पोलीस नायक विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे, डॉ. जाधव, डॉ. नाथक यांनी योग्य मार्गदर्शन केले.

कंचनपूर येथे कोरोना बाधित रुग्ण आढल्याने आरोग्य विभागाने १२ पथकाद्वारे २५० घराचे सर्वेक्षण केले. गावातील ४० संशयित रुग्णांना अकोला रेफर करण्यात आले आहे. कंचनपूर गावात ४५ लोकांना होम क्वारंटीन करण्यात आले असून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत असून फवारणी करण्याचे ग्रामपंचायतीला सांगण्यात आले आहे.- डॉ. अजयकुमार नाथक, प्रा. आ. केंद्र, आगर

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या