CoronaVirus : 'जीएमसी' ओपीडीतील रुग्ण संख्या ८० टक्क्यांनी घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 04:54 PM2020-04-25T16:54:25+5:302020-04-25T16:57:13+5:30

एरवी दोन-अडीच हजार रुग्णांची गर्दी असलेल्या सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आता मात्र दिवसाला केवळ ४०० ते ५०० रुग्ण दिसून येतात.

 CoronaVirus: GMC OPD patients reduced by 80%! | CoronaVirus : 'जीएमसी' ओपीडीतील रुग्ण संख्या ८० टक्क्यांनी घटली!

CoronaVirus : 'जीएमसी' ओपीडीतील रुग्ण संख्या ८० टक्क्यांनी घटली!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यांच्या सीमाबंदी आणि संचारबंदीमुळे ग्रामीण भागातून येणाºया रुग्ण संख्येत कमालीची घट दिसून येत आहे.सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आता ४०० ते ५०० रुग्ण आढळून येत आहेत.

अकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीचा परिणाम रुग्णालयातील रुग्ण संख्येवरही दिसून येत आहे. गत १५ दिवसांत सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल ८० टक्क्यांनी घटली आहे. एरवी दोन-अडीच हजार रुग्णांची गर्दी असलेल्या सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आता मात्र दिवसाला केवळ ४०० ते ५०० रुग्ण दिसून येतात.
सर्वोपचार रुग्णालयात अकोल्यासह जवळपासच्या जिल्ह्यातील शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. यातील बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील आहेत; परंतु कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यांच्या सीमाबंदी आणि संचारबंदीमुळे ग्रामीण भागातून येणाºया रुग्ण संख्येत कमालीची घट दिसून येत आहे. म्हणूनच एरवी दोन-अडीच हजार रुग्णांची गर्दी असणाºया सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आता ४०० ते ५०० रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अत्यावश्यक असेल, तरच उपचारासाठी येणाºया रुग्णांचा समावेश आहे. किरकोळ आजारी असणाºया रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. खासगी दवाखान्यातही अशा रुग्णांची गर्दी दिसून येत नाही. उपचाराच्या निमित्ताने लोक पडताहेत बाहेर सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाºया रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी, काही लोक उपचाराच्या नावाखाली बाहेर पडत असल्याचेही अनुभव डॉक्टरांना आले आहेत. सर्दी, खोकल्याचे रुग्ण जास्त सर्दी, खोकला आणि ताप येणे ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे असल्याने बहुतांश नागरिक कोरोनाच्या भीतीने थेट रुग्णालय गाठत आहेत; परंतु केवळ सर्दी, खोकला किंवा ताप म्हणजे कोरोना नव्हे. वातावरणातील बदलांमुळेदेखील या समस्या उद््भवू शकतात.

Web Title:  CoronaVirus: GMC OPD patients reduced by 80%!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.