शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
5
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
6
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
7
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
8
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
9
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
10
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
11
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
18
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
19
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
20
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

CoronaVirus : अकोल्यात आणखी चौघांना कोरोनाची लागण; मृत व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 21:12 IST

यामध्ये खैर मोहम्मद प्लॉट भागातील एक इसमाचा मृत्यू झाला आहे, हे विशेष.

अकोला : रेड झोनमध्ये समावेश झालेल्या अकोल्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, शुक्रवारी यामध्ये आणखी चौघांची भर पडली. जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉट भागातील एक,  बैदपुरा भागातील एक आणि कृषी नगरच्या कवरनगर भागातील दोघे अशा चार जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये खैर मोहम्मद प्लॉट भागातील एक इसमाचा मृत्यू झाला आहे, हे विशेष. यामुळे जिल्ह्यातील एकून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३२ झाला आहे. तर सध्या १७ जण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान  ज्या मयत व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला त्या व्यक्तीस मयत अवस्थेतच मंगळवार दि.२८ रोजी रुग्णालयात आणले होते. त्याचा घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो चाचणी साठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. हा ५६ वर्षीय व्यक्ती खैर महम्मद प्लॉट या भागातील रहिवासी असून तो फळ विक्रेता होता. अन्य एक रुग्ण ७९ वर्षीय पुरुष असून तो बैदपुरा भागात राहणारा आहे. तर एक ६६ वर्षीय महिला व ३९ वर्षीय पुरुष हे दोघे या आधीच्या एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपकार्तील असून ते कंवर नगर भागातील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे २३  अहवाल प्राप्त झाले. त्यातील १९ अहवाल निगेटीव्ह  तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एका व्यक्तीस  मंगळवारी (दि.२८ एप्रिल) मयत अवस्थेत  रुग्णालयात दाखल केले होते, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.दरम्यान आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३२ झाली असून प्रत्यक्षात १७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६९७ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६७१ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ६३९ अहवाल निगेटीव्ह तर ३२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  २६ अहवाल प्रलंबित आहेत.आजपर्यंत एकूण ६९७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५४४, फेरतपासणीचे ९२ तर वैद्यकीय कर्मचा?्यांचे ६१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२३ तर फेरतपासणीचे ८७ व वैद्यकीय कर्मचा?्यांचे ६१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६३९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३२  आहेत.

१७ रुग्णांवर उपचार सुरुआता सद्यस्थितीत  ३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील चार जण मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास व गुरुवारी (दि.३०) तिघांना असे ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १७ जण उपचार घेत आहेत.  दरम्यान आज अखेर ७२७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी  ३२४ गृहअलगीकरणात व १०१ संस्थागत अलगीकरणात असे ४२५ जण अलगीकरणात आहेत. तर २४० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर ६२ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला