शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अकोल्यात एकाच दिवशी चार मृत्यूंची नोंद; मृतकांचा आकडा ११ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 20:27 IST

कोविड-१९ आजाराने गत २४ तासात शहरातील विविध भागातील चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी सांगण्यात आले.

ठळक मुद्देयापैकी तीघांचा मृत्यू मंगळवारी झाला असून, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले. तर खंगनपुरा भागातील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू बुधवारी सकाळी झाला.बुधवारी एकून १०० अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर ९३ जणांचे निगेटिव्ह.

अकोला : अकोल्यात चांगलेच बस्तान मांडलेल्या कोरोना विषाणूने आता विक्राळ रुप धारण केले असून, बाधित रुग्णांसोबत मृत्यूमुखी पडणाऱ्यांचाही आकडा वाढतच आहे. कोविड-१९ आजाराने गत २४ तासात शहरातील विविध भागातील चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी सांगण्यात आले. आज नोंदविल्या गेलेल्या मृतकांमध्ये दोन महिला या बैदपुरा भागातील, एक व्यक्ती दाना बाजार भागातील, तर एक जण खंगनपुरा भागातील आहे. यापैकी तीघांचा मृत्यू मंगळवारी झाला असून, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आज स्पष्ट झाले. तर खंगनपुरा भागातील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू बुधवारी सकाळी ८ वाजताचे दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असताना झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बुधवारी एकून १०० अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर ९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एक महिला रुग्ण राधाकिसन प्लॉट, तर एक ताजनगर मधील आहे. तर सायंकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आलेले दोन रुग्ण ज्यात एक सहा वर्षिय बालिका व २० वर्षीय युवतीचा समावेश आहे. या दोघी अनुक्रमे मेहर नगर व ताजनगर भागातील आहेत. दरम्यान, कोविड आजाराने आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. तीन वर्षीय बालक कोरोनामुक्तदरम्यान, बुधवारी सायंकाळी एका तीन वर्षीय बालक्ष कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सदर बालकाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या