अकोला: जिल्ह्यात आजअखेरपर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. गेल्या दोन दिवसांत (दि.२१ व २२) विदेशातून आलेल्या नऊ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकाच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. दरम्यान प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात आज अखेर ७८ व्यक्ती विदेशातून आले. त्यातील ७७ जणांशी प्रशासनाने संपर्क केला आहे. पैकी ४४ जणांना खबरदारी म्हणून गृह अलगीकरण करुन निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आज सकाळी दाखल झालेल्या एका व्यक्तीस जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. गृह अलगीकरणात असलेल्या ३२ जणांचे १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Coronavirus : आठही जणांच्या चाचण्या ‘निगेटीव्ह’; एक अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 11:17 IST