शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Efect : पन्नास लाख रुपये उलाढालीचा फूलशेती व्यवसाय धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 10:49 IST

तीनशे शेतकऱ्यांसोबतच सहाशे फूलशेती मजूर बेरोजगार झाले आहेत.

- संतोषकुमार गवई लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर-शिर्ला शिवारातील पाचशे एकरवरील ५० लाख रुपये उलाढालीचा फूलशेती व्यवसाय ‘लॉकडाऊन’मुळे धोक्यात आला आहे. तीनशे शेतकऱ्यांसोबतच सहाशे फूलशेती मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.पातूर-शिर्ला शिवारात सुमारे ३०० शेतकरी गुलाब, डिवाइन गुलाब, गॅलार्डिया, बिजली, लिली, निशिगंध, मोगरा आदींसह विविध रंगीबेरंगी फुलांचा ५०० एकर शेती क्षेत्रावर व्यवसाय करतात. यावर ३०० शेतकऱ्यांसोबतच सोळाशेपेक्षा अधिक कुटुंबांतील सदस्य, त्याबरोबरच सहाशेहून अधिक फूलशेती मजूर आणि त्यांचे तीन हजार लोकसंख्येचे कुटुंब एवढ्या लोकांची उपजीविका भागविली जात होती; मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारने संचारबंदी आणि ‘लाकडाऊन’ निर्णय उपरोक्त कुटुंबांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे या कुटुंबातील चार ते पाच हजार नागरिकांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.शासनाने विशेष पॅकेज देऊन दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. सध्या वर्षभरातून फेब्रुवारी ते मे महिन्यातच लग्नसराई असते. त्यामुळे सर्वाधिक विक्री याच काळात होत असते.अकोला शहरातील ८५ टक्के फुलांची बाजारपेठ पातूरच्या फूल उत्पादनावर अवलंबून आहे. त्यातून होणारी ५० लाख रुपयांची उलाढाल चार ते पाच हजार कुटुंबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून देणारी आहे; मात्र गत २३ मार्चपासून हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्याने ५० लाखांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शासनाने ज्याप्रमाणे भाजीपाला आणि फळे यासाठी परवानगी दिली आहे, त्याचप्रमाणे फुलांसाठीसुद्धा परवानगी द्यावी, ‘लॉकडाऊन’मुळे फुलांचे उत्पादन घेणाºया शेतकºयांसह शेतमजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.- उमेश फुलारी, फूल उत्पादक शेतकरी पातूर.

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूर