शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच; आणखी एकाचा मृत्यू, १६ नवे पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ३२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:30 IST

२१ मे रोजी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली, तर आणखी १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२४ वर गेला आहे.मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही २१ झाली आहे.धवारी रात्री २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असले, तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरून त्याचे अपयश अधोरेखित होत आहे. गुरुवार, २१ मे रोजी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली, तर आणखी १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२४ वर गेला आहे. तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही २१ झाली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. शहर व जिल्हा मिळून बुधवार २० मे रोजी ३०० चा टप्पा ओलांडत बाधितांची संख्या ३०८ झाली. यामध्ये गुरुवारी आणखी १६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त १०४ अहवालांपैकी १६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित ८८ अहवाल निगेटिव्ह आहेत. गुरुवारी सकाळी प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल नऊ पुरुष व सात महिलांचे आहेत. यामध्ये रेल्वे कॉलनी जठारपेठ येथील तीन जण, फिरदौस कॉलनी येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, नायगाव येथील दोन, तर रजपूतपुरा, ज्योतीनगर सिव्हिल लाईन्स, न्यू राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, सोनटक्के प्लॉट, पुरपिडीत कॉलनी अकोट फैल, लक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, भीमचौक अकोट फैल येथील रहिवासी असलेला ६८ वर्षीय रुग्णाचा बुधवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या रुग्णाला १८ मे रोजी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सद्यस्थितीत ११२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.२४ जणांना डिस्चार्जएकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचा आकडाही दिलासा देणारा ठरत आहे. बुधवार, २० मे रोजी रात्री २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील २१ जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर तिघांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये अकोली गितानगर-चार, आंबेडकरनगर- चार, भिमचौक अकोट फैल-तीन, अकोट फैल भवानी पेठ-दोन, तर फिरदौस कॉलनी, डाबकी रोड, अकोट फैल, खोलेश्वर, रंगारहट्टी बाळापूर, सुभाष चौक, नेहरु नगर, खदान, सिव्हिल लाईन, खैर मोहम्मद प्लॉट, रामदास पेठ पोलीस क्वार्टर येथिल प्रत्येकी एकाचा समावेश आहे.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ३२४मयत-२१(२०+१),डिस्चार्ज- १९१दाखल रुग्ण(अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ११२

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या