शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आजपासून कोरोनाची ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 09:55 IST

शुक्रवारपासून ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’द्वारे संदिग्ध रुग्णांचे निदान होणार आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये मृत्यूचा दर वाढत आहे. या मृतकांमध्ये कोरोनाशिवाय इतरही आजारांच्या समस्या असल्याचे आढळून आले आहे. अशा रुग्णांचे निदान वेळेत व्हावे, यानुषंगाने अकोल्यात शुक्रवारपासून ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’द्वारे संदिग्ध रुग्णांचे निदान होणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या ‘आरटी-पीसीआर’ यंत्रणेद्वारे कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांची वैद्यकीय चाचणी केली जाते. या यंत्रणेद्वारे रुग्णाचा चाचणी अहवाल येण्यास आठ तासांचा वेळ लागतो; मात्र ज्या रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार होते, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर अंकुश लावण्यासाठी अशा रुग्णांचे निदान वेळेत होणे गरजेचे आहे. शिवाय, गर्भवतींचेही निदान प्रसूतीनंतर होत असल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा धोका संभवू शकतो. कोरोनाचा हा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टिकोनातून अशा अत्यावश्यक रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीसाठी शुक्रवारपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’ घेण्यास सुरुवात केली जाणार आहे.अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही यंत्रणा सज्जअकोल्यासह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातही ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यासाठी आवश्यक यंत्रसामग्री गुरुवारी नागपूर येथून तिन्ही जिल्ह्यांत पोहोचविण्यात आली आहे.ही केवळ ‘स्क्रिनिंग टेस्ट’ ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’ ही केवळ ‘स्क्रिनिंग टेस्ट’ असणार आहे. यामध्ये रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यास त्याची ‘आरटी-पीसीआर’ यंत्रणेद्वारे पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून कोविड योद्ध्यांना संभाव्य संक्रमणाचा धोका टाळणे शक्य होणार आहे.

अकोल्यासह अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ‘ट्रूनेट बिटा कोविड टेस्ट’ची यंत्रणा प्राप्त झाली आहे. ही स्क्रिनिंग टेस्ट असून, आपत्कालीन रुग्णांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. एका तासात दोन अहवाल या माध्यमातून प्राप्त होणार आहेत. शुक्रवारपासूनच अकोला ‘जीएमसी’मध्ये ही यंत्रणा सुरू होणार आहे.- डॉ. रियाझ फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला मंडळ, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला